OTT : चित्रपट रसिकांसाठी एप्रिल महिना खास असणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये 2022 मध्ये हॉटस्टार (Hotstar), झी- 5, नेटफ्लिक्स (Netflix) आणि प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफोर्मवर कॉमेडी आणि अॅक्शन असणारे जबरदस्त चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊयात एप्रिल महिन्यामध्ये कोणते चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहेत. 


कौन प्रवीण तांबे? (Kaun Pravin Tambe)
कौन प्रवीण तांबे या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे हा प्रमुख भूमिका साकरणार आहे. इकबालनंतर आता पुन्हा श्रेयस क्रिकेटच्या मौदावर खेळताना दिसणार आहे. हा चित्रपट एक एप्रिल रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार  या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 
 


द लास्ट बस (The Last Bus)
'द लास्ट बस' हा चित्रपट एका सायन्स फिक्शन कथानकावर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक एका रोबोटवर आधारित आहे. हा चित्रपट एक एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 



मिशन सिंड्रेला (Mission Cinderella)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मिशन सिंड्रेला हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये अक्षयसोबतच रकुल प्रीत सिंह देखईल प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचं शूटिंग हे भारताबाहेर यूकेमध्ये झालं आहे. 



संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha