Kartik Aaryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या जोरदार चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनच्या लव्ह लाइफ बाबत जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते देखील उत्सुक आहेत. कार्तिक आर्यन साऊथ अभिनेत्री श्रीलीलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आणि श्रीलीलाच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. कार्तिकच्या फॅमिली फंक्शनमध्येही ती दिसून आली होती. तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलं. त्याचबरोबर अभिनेता कार्तिकच्या आईनेच कार्तिकच्या डेटिंगबाबत बोलताना हिंट दिली होती. त्यामुळे सध्या ते डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
श्रीलीला साऊथची अभिनेत्री आहे. तिने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. डॉक्टर होण्याआधीच श्रीलीलाने 2021 मध्ये किस या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. ती उत्तम भरतनाट्यम डान्सरही आहे. श्रीलीलाची आई देखील एक गायनॉकोलॉजिस्ट आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर श्रीलीला सुपरस्टार सुपरनेनी सुभाकर यांची मुलगी असल्याचं देखील बोललं जात होतं. मात्र पत्नीपासून घटस्फोटानंतर श्रीलीलाचा जन्म झाल्याने ती माझी मुलगी नसल्याचं अभिनेत्यानं सांगितलं होतं. 23 वर्षांची श्रीलीला कार्तिक आर्यनपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. याशिवाय ती दोन मुलांची आई देखील आहे. 2022 मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलं गुरू आणि शोभिता यांना दत्तक घेत त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे. सध्या कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांच्या डेटबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत.
आजघडीला कार्तिक आर्यनचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. याच अभिनेत्यासोबत सध्या एका अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री अवघ्या 23 वर्षांची असून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 23 वर्षांच्या अभिनेत्रीचे नाव श्रीलीला आहे. या अभिनेत्रीने एकूण दोन मुलांना दत्तक घेतलेलं आहे. म्हणजेच सध्या ती दोन मुलांचं आई म्हणून संगोपन करत आहे. अलीकडेच कार्तिक आर्यनची आई माला तिवारी यांना तुम्हाला कशी सून हवी आहे, असे विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना मला एक डॉक्टर सून हवी आहे, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. त्यांच्या या उत्तरानंतर कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण श्रीलालाने एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे.
श्रीलालाचा जन्म 14 जून 2001 रोजी झाला आहे. तिने आतापर्यंत तेलुगु, कन्नड भाषेतील मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे. सिनेसृष्टीत काम करण्यास श्रीलालाला सुरुवातीला तिच्या घरच्यांनी विरोध केला होता.डॉक्टर होण्याआधीच श्रीलीलाने 2021 मध्ये किस या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तिच्या जिद्दीपुढे कुटुंबीयांनी माघार घेत तिला चित्रपटांत काम करण्यास सहमती दर्शवली. कोईमोईच्या रिपोर्टनुसार तिच्या संपत्तीचे मूल्य 15 कोटी रुपये आहे. करिअरच्या सुरुवातीला तिने चित्रपटात काम करण्यासाठी एका तासाला 4 लाख रुपये याप्रमाणे फी घेतली होती. आजघडीला ती चित्रपटात काम करण्यासाठी चार कोटी रुपये घेते. दरम्यान, लवकरच कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांचा एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरवलेले नाही मात्र त्याचा एक टिझर व्हिडीओ जारी करण्यात आला होता. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या - कार्तिक आर्यन अवघ्या 23 वर्षीय सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात? दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण!