karisma kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरच्या (Karisma Kapoor) अभिनयाला तिच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. करिश्मानं काही वर्ष अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिनं ओटीटीवर रिलीज झालेल्या मेंटलहुड या सीरिजमध्ये काम केले. आता ही सीरिज रिलीज झाल्यानंतर दोन वर्षानं करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर करिश्मानं एका पोस्ट शेअर करून तिच्या या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांना माहिती दिली. करिना कपूर आणि मलायका अरोरानं तिच्या या नव्या प्रोजेक्टसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.  


करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. करिश्मानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती एका क्लॅप बोर्डच्या मागे थांबलेली दिसत आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. करिश्मानं पोस्टमध्ये लिहिले, 'नवी सुरूवात'  अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे. अभिनयनं  डेली बेली, फोर्स 2 आणि ब्लॅमेल या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. करिना आणि मलायकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून करिश्माला शुभेच्छा दिल्या तर सोनमनं करिश्माच्या पोस्टला, 'तुला शुभेच्छा लोलो' अशी कमेंट केली. 






करिश्मासोबतच या नव्या प्रोजेक्टमध्ये सूर्य शर्मा हा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. सूर्यनं अनदेखी सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.


हे देखील वाचा-