Kareena Kapoor Khan : केजीएफ 2 (KGF2) नंतर यशच्या (Yash) पुढील सिनेमाचे सर्व चाहते प्रतिक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वीचं यशने एका नव्या प्रोजेक्टची घोषणा केलीये. टॉक्सिक असे नव्या प्रोजेक्टचे नाव आहे. हाही केजीएफप्रमाणे सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी आशा प्रक्षकही व्यक्त करत आहेत. दरम्यान आणखी एक विशेष बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यशच्या नव्या प्रोजेक्टमधून दाक्षिणात्य सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. 


दिग्दर्शक गीतू मोहनदास (Geetu Mohandas) नेहमीच समीक्षकांच्या पसंतीस उतरते. मोहनदास हीच यशच्या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहे. यशच्या सिनेमांनी आजवर नेहमीच बंप्पर कमाई केली आहे. दरम्यान, आता नव्या टॉक्सिक या सिनेमातील कास्टही मोठी आहे. आता यश आणि करिना कपूर एकत्रित येणार असल्याने हा सिनेमाही तुफान कमाई करेल, असे बोलले जात आहे.  


दाक्षिणात्य सिनेमामध्ये पदार्पण करणार करिना 


बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आता दाक्षिणात्य सिनेमामध्ये पदार्पण करणार आहे. तिने 24 वर्षांपूर्वी पहिला सिनेमा केला होता. 'रिफ्यूजी' हा तिचा पहिला सिनेमा होता. तेव्हापासून तिच्या बॉलिवूड सिनेमांमधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. टॉक्सिकचे निर्माते करिनाच्या पदार्पणासाठी उत्सुक आहेत. त्यांनी करिनासोबत चर्चाही सुरु केल्या आहेत. 


'जानेजा'मधील भूमिका चर्चेत 


सरत्या वर्षात करीनाचा जानेजा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली आहे. करीनाने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मात्र, जानेजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चेत आली होती. एका मुलाखतीत तिने विविध विषयांवर भाष्य केलं. जुने कलाकार किती मेहनती आहेत? पुरुषांना संपूर्ण क्रेडीट दिलं जात? अशा विविध मुद्यांवर तिने भाष्य केलं आहे. 


 'जानेजा' नंतर पु्न्हा एका नेटफिल्क्सवर दिसणार करीना  


करीना आता नेटफिल्क्सवर देखील दिसणार आहे. 'बकिंघम मर्डर्स' हा तिचा पुढील सिनेमा आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपटातून क्राईम आणि थ्रिलर दाखवण्यात येणार आहे. याशिवाय 2024 मध्ये तिचे 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. करीना तब्बू, कृती सेनॉन, दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा या कलाकारांसमवेत 'द क्रू' मध्ये दिसणार आहे. त्यानंतर अजय देवगनच्या सिंघम 3 मध्येही तिची प्रमुख भूमिका असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Amala Paul Announced Pregnancy : लग्नाच्या 2 महिन्यांनंतर दाक्षिणात्य अभिनेत्री झाली प्रेग्नंट, इन्स्टाग्रामवरुन दिली गुडन्यूज