Amala Paul Announced Pregnancy : दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल (Amala Paul) अनेक वर्षांपासून जगत देसाई याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोन महिन्यांपूर्वीच ती जगतबरोबर विवाहबंधनात अडकली. दरम्यान, लग्नाच्या दोन महिन्यांनंतर लगेच तिने आता इन्स्टाग्रामवरुन गुड न्यूज (Good News) दिली आहे. तिने प्रेग्नंट असल्याचे जाहिर करत सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिलाय. अमला पॉल गुड न्यूज फार आनंदी झाली आहे. 


बेबी बंप दाखवताना फोटो शूट 


प्रेग्नंट झाल्यानंतर अमला पॉल हिचा आनंद गगनात मावत नाहीये. तिने बेबी बंप दाखवतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. फोटो शूट करताना अमलाचा पतीही सोबत आहे. अमला पॉलने लाल ड्रेस परिधान करुन समुद्राच्या रॉक गार्डनवर फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना अमलाने लिहिले की, "Now I know that 1+1 is 3 with you!" अमालाने गुड न्यूज शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री काजल (Kajol) अग्रवालनेही त्यांचे अभिनंदन केलंय. सध्या अमलाचं वय 32 इतके आहे. तर जगत हा मूळचा गोव्याचा राहिवासी आहे. तो गोव्यामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. 


 






अमलाने 2023 मध्ये उरकला होता विवाह


अमला आणि जगत 5 नोव्हेंबर 2023 रोजी कोच्चीमध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नात तिने डिझायनर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये अमला अतिशय सुंदर दिसत होती. तर जगतनेही अमलाच्या ड्रेसिंगला मॅच होईल, असा ड्रेस परिधान केला होता. अमला पॉलाचा हा दुसरा विवाह होता. यापूर्वी तिने अभिनेता, दिग्दर्शक एएल विजय याच्याशी 2014 मध्ये विवाह केला होता. दरम्यान, 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. 


हिंदी, तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम 


अभिनेत्री अमला पॉल खासकरुन हिंदी, तामिळ आणि मल्याळम भाषेतील सिनेमांमध्ये काम करते. नुकताच तिचा ममूटी कि क्रिस्टोफर (Christopher) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिवाय, तिने अजय देवगणच्या भोला या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. सध्या पॉल ही तिच्या पृथ्वीराज अभनीत दग्दर्शित आदुजीविथम या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shivrayancha Chhava : "कोण शत्रू यावरी करील कैसा कावा,वाघालाही फाडतो हा शिवरायांचा छावा; दिग्पाल लांजेकराच्या आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज