Kangana Ranaut on Gehraiyaan : बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) अभिनित चित्रपट ‘Gehraiyaan’ नुकताच OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Videoवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा नव्या पिढीतील नातेसंबंधांमधील गोंधळ आणि त्यातील वैशिष्टय़े सांगते. दीपिका पदुकोणच्या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पत्रकाराला फटकारणाऱ्या कंगना रनौतने आता चित्रपटाबद्दल संपूर्ण समीक्षण लिहिले आहे. कंगना रनौतने (Kangana Ranaut) दीपिका पदुकोणच्या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.
शनिवारी रात्री कंगना रनौतने तिच्या इंस्टा स्टोरीजवर मनोज कुमार आणि माला सिन्हा यांच्या चित्रपटातील 'चांद सी मेहबूबा हो मेरी' हे गाणे शेअर केले आणि लिहिले की, 'मीही मिलेनियमची स्टार आहे, पण तरीही अशीच आहे. मला प्रणय माहित आहे आणि समजतो.’
चित्रपटात कोणतीही Gehraiyaan नाही!
कंगना रनौतने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'कृपया मिलेनियम/नवीन पिढी आणि शहरी चित्रपटांच्या नावाने ही सर्व रद्दी विकू नका. वाईट चित्रपट हे वाईटचं असतात. तुम्ही कितीही शरीरयष्टी किंवा पोर्नोग्राफी दाखवली, तरी तुम्ही चित्रपटाला वाचवू शकणार नाही. पहा, मूळ वस्तुस्थिती अशी आहे की यात Gehraiyaan नावाची गोष्टच नाही.’ कंगना रनौतने या पोस्टद्वारे दीपिकाच्या चित्रपटावर सडकून टीका केली.
प्रेक्षकांचाही संमिश्र प्रतिसाद
दीपिका पदुकोणच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटावर येणाऱ्या प्रतिक्रियाही अगदीच साध्या आहेत. कोविड आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन हा चित्रपट Amazon Prime वर प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :
- Naagin 6 : ‘आग लगा दी....’, तेजस्वी प्रकाशचा ‘नागिन’ लूक पाहून चाहतेही घायाळ!
- Samantha Ruth Parbhu : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यावर फिदा झालीये समंथा! व्यक्त केली एकत्र काम करण्याची इच्छा!
- Riteish Deshmukh : ‘मी जे करतो त्याला प्रेम नाही वेड म्हणतात’, रितेश देशमुखची पत्नी जेनेलियासाठी खास पोस्ट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha