Karan Johar birthday Party : प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) काही दिवसांपूर्वी 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यशराज स्टुडिओमध्ये ही पार्टी पार पडली. पण करणच्या वाढदिवसाची ही पार्टी कोविडची सुपर स्प्रेडर पार्टी ठरत आहे का? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे कारण या पार्टीत आलेल्या 50 ते 55 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या पार्टीमध्ये उपस्थित होते. बॉलिवूडमधील कलाकार कोरोना संसर्ग लपवत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.
कतरिना कैफला कोरोनाची लागण
अभिनेत्री कतरिना कैफला 1 जून रोजी कोरोनाची लागण झाली. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली होती. कतरिना ही करणच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होती.
कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिकनं त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं, त्यामुळे कोरोनाला पण राहावलं नाही.'
या कलाकारांनी पार्टीला लावली होती हजेरी
अनन्या पांडे, फराह खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, ह्रतिक रोशन, जुही चावला,विकी कौशल, सलमान खान, काजोल, राणी मुखर्जी, करीना कपूर,कियारा आडवाणी, जाह्नवी कपूर,शाहरुख खान आणि मलयाका आरोरा यांसारख्या अनेक बॉलिवूडमधील कलाकारांना कऱण जोहरच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती.
हेही वाचा:
- Farah Khan : करणच्या बर्थ-डे पार्टीमधील खास फोटो फराह खानकडून शेअर; सेलिब्रिटी दिसले थिरकताना
- Body spray advertisement : बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरून सुरु झाला वाद, युट्यूब आणि ट्विटरवरून हटवण्यासाठी सरकारचा आदेश!
- Urfi Javed : काचा, प्लास्टिकनंतर आता पोत्यापासून ड्रेस; उर्फीचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या