IIFA 2022 : सध्या दुबईमध्ये आयफा (IIFA 2022) पुरस्कार सोहळ्याचा समारंभ सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. आयफा सोहळ्या दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयफा सोहळ्यामध्ये गायक आणि रॅपर असणाऱ्या हनी सिंहनं खास परफॉर्मेन्स होता. या परफॉर्मन्स दरम्यान हनी सिंह हा  ए.आर. रहमान (AR Rahman) यांच्या समोर नतमस्तक झाला. 


आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये हनी सिंहनं एक खास  परफॉर्मन्स केला. तो परफॉर्म करत असताना ए. आर. रहमान हे प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यावेळी हनी सिंह हा स्टेजच्या खाली येतो आणि ए.आर. रहमान यांच्या समोर नतमस्तक होतो. यावेळी ए.आर.रहमान हे हनीला आशीर्वाद देतात. आयफाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हनी सिंहचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 


पाहा फोटो :






पाहा व्हिडीओ:




या कारणांमुळे हनी सिंह चर्चेत :



या व्हायरल फोटोशिवाय हनी सिंग त्याच्या आयफा अवॉर्ड्समधील लूकमुळे देखील खूप चर्चेत आहे. हनीनं आफामध्ये लिझार्ड स्टाइल नेकपीस घातला होता. या नेकपीसनं अनेकांचे लक्ष वेधले. 




बप्पी लाहिरी यांना शाहिद वाहणार श्रद्धांजली


शाहिद कपूर म्हणाला, 'मी माझ्या अभिनयाने बप्पी दा यांना आदरांजली वाहीन. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांवर मी परफॉर्म करणार आहे. यावेळी मी माझ्या कोणत्याही गाण्यावर परफॉर्म करणार नाही, फक्त बप्पी दाच्या गाण्यांवर परफॉर्म करून त्यांना म्युझिकल ट्रिब्युट देणार आहे.’