Urfi Javed :  फॅशनमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फी ही कधी  प्लास्टिकचा, तर कधी सेप्टीपीन्सपासून तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट करते. अनेक लोक उर्फीला तिच्या या फॅशनमुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक देखील करतात. उर्फीनं आता पोत्यापासून तयार केलेल्या ड्रेसमधील लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Continues below advertisement


उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका पोत्यापासून तयार केलेल्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'पोतं की ड्रेस?' उर्फीनं हा व्हिडीओ शेअर करुन तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली की, हा ड्रेस तिनं केवळ दहा मिनीटांमध्ये तयार केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या या फॅशन सेन्सला ट्रोल केलं आहे. 


पाहा व्हिडीओ: 






उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'मला कोणी काम देत नाही, तसेच माझ्याकडे देखील पैसे नाहीत. ' ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 


हेही वाचा :