Kapil Sharma Weight Loss: कॉमेडी जगात आपल्या खास शैलीने समोरच्याला खळखळून हसवणारा 'कॉमेडी किंग’ कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या विनोदामुळे नव्हे, तर त्याच्या जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे (Fitness Transformation) चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या त्याच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः थक्क केले आहे. कारण अवघ्या 63 दिवसांत कपिलने तब्बल 11 किलो वजन कमी केले आहे. आता तो अधिक निरोगी आणि तंदुरुस्त दिसत आहे. कपिलच्या या बदलामागे कोणतीही ट्रेंडिंग डाएट पद्धत किंवा कठोर जिम रुटीन नाही. त्यामागे आहे एक व्यवस्थित आखलेला लाइफस्टाइल रीसेट प्लॅन. हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर योगेश भाटेजा यांनी कपिलसाठी खास तयार केलाय. त्यांच्या सल्ल्यानुसार कपिलने ‘21-21-21 फिटनेस रूल’ पद्धत फॉलो करून इतक्या कमी वेळात 11 किलो वजन कमी केलंय.

Continues below advertisement


21 ते 42 दिवस- स्वच्छ आणि हेल्दी आहार


या रुलनुसार फिटनेसची वाटचाल तीन टप्प्यांत विभागली जाते, पहिले 21 दिवस  हलक्या व्यायामाला सुरुवात. या कालावधीत शरीराला ताण न देता फक्त सौम्य व्यायाम, स्ट्रेचिंग आणि हलकी फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीची सवय लावायची असते. कपिलनेही पहिल्या टप्प्यात फक्त शरीराची हालचाल वाढवण्यावर भर दिला. दुसऱ्या टप्प्यात भाटेजांनी कपिलला पूर्णपणे पौष्टिक आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला. दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थांपासून पूर्ण दूर राहण्यास त्याला सांगितले होते. या काळात कपिलचा मेटाबॉलिझम सुधारला आणि वजन घटण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली.






42 ते 63 दिवस, वाईट सवयींवर पूर्णविराम


या रुलमधला शेवटचा टप्पा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. 42 ते 63 दिवसांच्या या कालावधीत शरीरासाठी नुकसानकारक ठरणाऱ्या सवयींपासून दूर राहणे गरजेचे असते. स्मोकिंग, ड्रिंकिंगसारख्या सवयी पूर्णपणे बंद करण्यावर भर दिला जातो. कपिलनेही या सवयींवर नियंत्रण ठेवत आपली लाइफस्टाइल अधिक शिस्तबद्ध केली. या संपूर्ण प्रक्रियेत कपिलकडून मोठ्या प्रमाणावर ओव्हरट्रेनिंग किंवा घाईघाईत केलेली क्रॅश डाएटिंग अपेक्षित नव्हती. उलट सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि संतुलित जीवनशैलीमुळे कपिलने कमी वेळात उत्कृष्ट परिणाम साधले. कपिलच्या फिटनेस जर्नीतून दिसते की परफेक्ट बॉडीसाठी अतिरेकी डाएट किंवा कठोर वर्कआउटची गरज नसते. योग्य प्लॅनिंग आणि हेल्दी सवयी स्वीकारूनही फिट आणि निरोगी राहता येऊ शकते.