Shefali Jariwala Struggle: अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) ही 'काँटा लगा' या गाण्यामुळे विशेष ओळखली जाते. या गाण्याने एक वातावरण तयार केलं होतं आणि याच गाण्यामुळे शेफालीच्या देखील बऱ्याच चर्चा सुरु होत्या. पण या गाण्यानंतर मात्र तिला कोणतीही लक्षात राहण्यासारखी भूमिका मिळाली नाही.


शेफाली ही बिग बॉस 13 च्या घरातही दिसली होती. त्यानंतर मात्र ती विशेष चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं. नुकतच या अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य केलं आहे.        


कदाचित तेव्हा जीवही गेला असता - शेफाली


आयुष्यातील तो कठीण प्रसंग सांगत शेफालीने म्हटलं की, 'तिला मिरगीचे झटके येत होते. एपिलेप्सी ही न्यूरोलॉजिकल समस्या आहे. हे अनुवांशिक देखील असू शकते. जेव्हा तुमचा मेंदू तणाव हाताळू शकत नाही तेव्हा जास्त तणावामुळे हे घडते. मी 15 वर्षांची असताना मला पहिला झटका आला होता. बोर्डाच्या परीक्षांमुळे मी खूप तणावात होते. त्यावेळी मी बाल्कनीत उभी होते आणि मला तो झटका आला. कदाचित तेव्हा बाल्कनीत खाली पडून माझा जीवही गेला असता.' 


'या गाण्यामुळे मला खूप ओळख मिळाली'


शेफालीने काँटा लगा गाण्यावर बोलताना म्हटलं की, कलाकार म्हणून ओळख मिळवण्यासाठी प्रत्येकाला खूप मेहनत घ्यावी लागते. काँटा लगा या गाण्यामुळे मला खूप ओळख मिळाली. तो माझा पहिलाच प्रोजेक्ट होता आणि तो हिटही झाली. आजही ते गाणं लोकांच्या लक्षात आहे, असंही शेफालीने म्हटलं. 


शेफाली मुल दत्तक घेणार


शेफालीने मुल दत्तक घेण्यावरही भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, मुलाला दत्तक घेण्याची प्रक्रिया ही खूप मोठी आहे. तुमच्या कुटुंबाला समजावावं लागतं आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे त्याला वेळली लागतो. पण आम्ही पूर्ण केले आहेत आणि आम्ही वाट पाहतोय की आमच्या घरी कधी मुलगी येईल. 






ही बातमी वाचा : 


Marathi actress : मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, मालिकेतून घेतला निरोप; आता 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका