Oscars 2022 : नुकताच ऑस्कर पुरस्कार 2022 (Oscars Awards 2022) सोहळा पार पडला. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. काल पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यामध्ये एक घटना घडली. विल स्मिथनं  ख्रिस रॉक (Chris Rock) च्या कानशिलात लगावली. विल स्मिथच्या पत्नीबद्दल म्हणजेच  जॅडा स्मिथबद्दल  ख्रिस रॉकनं वक्तव्य केलं. त्यामुळे  विल स्मिननं  विलला कानाखाली मारली. या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने ख्रिसला पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

Continues below advertisement

कंगनानं इन्स्टाग्रामवर विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'जर एक मूर्ख माणूस लोकांना हसवण्यासाठी जर माझ्या आई किंवा बहिणीबद्दल कोणी अशी चेष्टा करत असेल तर मी देखील तेच करेल जे स्मिथनं केलं. '

 'किंग रिचर्ड्स' चित्रपटासाठी विल स्मिथला मिळाला ऑस्करविल स्मिथचा 'किंग रिचर्ड्स' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक टेनिसपटू सेरेना, व्हीनस विल्यम्सचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विल स्मिथनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच अनजानु एलिस, सानिया सिडनी, डेमी सिंगलटन, टोनी गोल्डविन आणि जॉन बर्नथल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :

Continues below advertisement

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha