Vishwas Patil on Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सिनेक्षेत्रापेक्षा भाजपने तिला दिलेल्या उमेदवारीमुळे चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कंगानाने जोरादार प्रचार सुरु केलाय. कंगनाने प्रचारादरम्यान, सरदार पटेल यांना इंग्रजी येत नव्हते, असा दावा अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केला होता. कंगना रणौतच्या दाव्यांची इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी चिरफाड केलीये. शिवाय ट्वीटरच्या माध्यमातून विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी कंगनाच्या अज्ञानाबाबत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले विश्वास पाटील ?
अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) सरदार पटेल यांच्याबाबत खोटा दावा केल्यानंतर विश्वास पाटील यांनी ट्वीटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये विश्वास पाटील (Vishwas Patil) लिहितात, कंगना जी सरदार वल्लभाई पटेल हे बॅरिस्टर होते ! लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरी पूर्ण केली होती. ते अहमदाबाद कोर्टातले एक लीडिंग फौजदारी वकील होते. त्यांचे इंग्रजीवर इतके प्रभुत्व आणि मास्टरी होती की, अनेक ब्रिटिश जज त्यांचं कोर्टामधलं प्रतिपादन ऐकण्यासाठी उत्सुक असायचे, असं पाटील (Vishwas Patil) यांनी स्पष्ट केलं.
पुढे लिहिताने ते (Vishwas Patil) म्हणाले, तेच नव्हे तर त्यांचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल हे सुद्धा बॅरिस्टर होते. ते सुद्धा निष्णात वकील होते. या दोघा भावांचे इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व आणि त्यांची व्याख्याने याबद्दल इतिहासामध्ये अनेक दंतकथा व सत्यकथा प्रचलित आहेत. त्यामुळे वल्लभाईंना इंग्रजी येत नव्हते असा आपण लावलेला जावईशोध हा आपल्या अज्ञानाचा भाग समजायचा का ? असा सवालही विश्वास पाटील यांनी केला आहे.
कंगना मंडी मतदारसंघातून मैदानात
अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) भाजपने मंडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली आहे. कंगना रणौत मतदारांना स्थानिक भाषेत आवाहन करताना दिसत आहे. शिवाय, तिने काँग्रेसवर गंभीर आरोपही केले आहेत. मी स्टार आहे किंवा हिरोईन आहे, असा विचार करु नका. तुमची लेक समजून मला मतदान करा, असं आवाहन कंगनाने मंडीतील लोकांना केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या