Kangana Ranaut : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी (29 जून) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर मत व्यक्त केलं. मराठी चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिल्या. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक व्हिडीओ शेअर करुन शिवसेना आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर मत व्यक्त केलं आहे.
कंगनाची पोस्ट
कंगनानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, '1975 नंतर आता ही वेळ भारताच्या लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची वेळ आहे. 1975 मध्ये लोकनेता जे. पी. नारायण यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर सिंहासन पडले होते. 2020 मध्ये मी सांगितलं की लोकशाही हा एक विश्वास आहे. सत्तेच्या अहंकारामध्ये येऊन जे लोक हा विश्वास तोडतात. त्यांचा अहंकार तूटनं देखील निश्चित आहे. ही खऱ्या चरित्राची शक्ती आहे. हनुमान हा शिव देवाचा बारावा अवतार मानला जातो. जर शिवसेनाच हनुमान चालिसा बॅन करत असेल, तर त्यांना शिव देखील वाचवू शकत नाही. हर हर महादेव, जय हिंद, जय महाराष्ट्र' या व्हिडीओला कंगनानं कॅप्शन दिलं आहे, 'जेव्हा पाप जास्त होते तेव्हा विनाश होतो आणि नंतर नवी निर्मिती होते. नंतर जीवनाचे कमळ देखील फुलते.'
पाहा व्हिडीओ:
कंगनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट असतात चर्चेत
कंगनाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल असतात. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना ही उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, 'माझं घर तोडून माझा बदला घेतला असं तुम्हाला वाटत आहे का? आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. सर्वच वेळ सारखी नसते हे लक्षात असूद्या.'
हेही वाचा: