Dhaakad On Zee5 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) सिनेमा 20 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून या सिनेमाने चांगलीच निराशा केली आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. पण आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


'धाकड' सिनेमा रिलीज आधीपासूनच चर्चेत होता. हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण या सिनेमाने सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाचे शो रद्द करण्यात आले होते. मोठ्या पडद्यावर जोरदार आपटल्यानंतर आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्ममवर 'धाकड' प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक 1 जुलैपासून झी 5 वर हा सिनेमा पाहू शकतात. झी 5 ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. आता प्रेक्षक घरबसल्या 'धाकड' सिनेमा पाहू शकतात. 


निर्मात्यांना बसला आर्थिक फटका


'धाकड' सिनेमा 85 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. सिनेमा अयशस्वी झाल्यामुळे 'धाकड'च्या निर्मात्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 2.58 कोटींची कमाई केली. त्यामुळे निर्मात्यांचे 78 कोटींचे नुकसान झाले. 


'धाकड'मध्ये अॅक्शनचा तडका


कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कंगनाचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमात कंगनाने एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.


संबंधित बातम्या


Dhaakad : कंगनाच्या 'धाकड'ची किंमत फक्त 2.58 कोटी, निर्मात्याचे 78 कोटी रुपये पाण्यात


Dhaakad : कंगनाचा 'धाकड' ठरला सुपरफ्लॉप; रिलीजच्या आठव्या दिवशी देशभरात 20 तिकिटांची विक्री