Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं असेल, याबाबत चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती आली आहे.
कॅबिनेट
देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील
संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे
डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे
विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर
हे राज्यमंत्री होण्याची शक्यता
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर
शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत
कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर
राज्यमंत्री
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील एक दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काल उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानं सरकार कोसळलं.
इतर महत्वाच्या बातम्या