Kangana Ranaut on Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) सोमवारी (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान आजपासूनच रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) आजही रामाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. कंगणाने आज रामभद्राचार्य यांची भेट घेतली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.


'अयोध्येचा राजा मोठ्या वनवासानंतर घरी परतणार'


रामभद्राचार्य यांची भेट घेतल्यानंतर कंगणा राणावतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. कंगणा म्हणाली, "आज परमपूज्य श्री राम भद्राचार्य यांची भेट झाली. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याद्वारे शास्त्रवत सामुहिक हनुमान यज्ञाचे देखील आयोजित करण्यात आले होते. त्यात मी देखील सहभागी झाले. अयोध्येत रामाचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरण राममय झाले आहे. उद्या अयोध्येचा राजा मोठ्या वनवासानंतर घरी परतणार आहे", असे कंगणा राणावत म्हणाली आहे. 


रामाच्या मूर्तीचे कंगणाकडून कौतुक 


अभिनेत्री कंगणा राणावत (Kangana Ranaut) हीने रामाच्या मूर्तीचे फोटो शेअर करत मूर्तीकारांचे कौतुक केले आहे. कंगणाने कल्पना केली होती तशीच तिला मोहित करणारी रामाची मूर्ती आहे. कंगणाने श्री रामाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले होते. कंगणाने मूर्तीचे फोटो शेअर करताना लिहिले की, "मला वाटत होतं रामाची मूर्ती मला तरुणाप्रमाणे वाटेल. मात्र, मी रामाची कल्पना करत होते, त्याच पद्धतीची मूर्ती साकारण्यात आली आहे"


मूर्तीकार योगीराज यांचे कंगणाकडून तोंडभरुन कौतुक 


कंगणाने रामाचा आणखी एक फोटो शेअर केला. याबाबत लिहिले की, "किती सुंदर आणि मनाला मोहित करणारी ही मूर्ती आहे. अरुण योगीराज यांच्यावर मूर्ती बनवण्यासाठी किती दबाव असेल. खुद्द एका दगडाला देवाच्या रुपात आणले, ही रामाचीच कृपा आहे. अरुण योगीराज यांना श्रीरामाने स्वत: दर्शन दिले आहे. तुम्ही धन्य आहात." अरुण हे मूळचे मैसूरचे आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामाच्या मूर्तीची पहिली झलक गुरुवारी (दि.18) सर्वांना पाहायला मिळाली होती. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Anupam Kher : "जय श्री राम! 'या' दिवसाची खूप वाट पाहिली"; अयोध्येला जाताना अनुपम खेर यांना अश्रू अनावर