Naagin 6 : ‘आग लगा दी....’, तेजस्वी प्रकाशचा ‘नागिन’ लूक पाहून चाहतेही घायाळ!
'बिग बॉस 15' संपताच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आता 'नागिन 6' मध्ये दिसणार आहे. तेजस्वी तिच्या नव्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. आतापर्यंत आलेल्या प्रोमोजमध्ये तिला चांगलीच पसंती मिळाली होती. आता तेजस्वीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश 'नागिन' ड्रेस अपमध्ये दिसत आहे. तिने गोल्डन कलरचा बिकिनी टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
तेजस्वीने नाकात छोटी नथणी घातली, असून केस मोकळे सोडले आहेत. कॅमेऱ्याकडे बघून ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देत आहे.
या फोटोंसोबत तेजस्वीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एका वेगळ्या भूमिकेतून मी तुम्हा सर्वांना भेटायला येत आहे. यावेळी कथा वेगळी असेल.’
तेजस्वीच्या या फोटोंवर करण कुंद्राने ‘फायर’ इमोजी पोस्ट केला आहे. तर, एकता कपूरने कमेंट करत, 'जय माता दी’ म्हटले आहे.
शोमधील तेजस्वीच्या पात्राचे नाव ‘प्रथा’ असणार आहे. तिच्यासोबत 'बिग बॉस 15' चा आणखी एक स्पर्धक सिंबा नागपाल देखील या मालिकेत झळकणार आहे.
तेजस्वीशिवाय अभिनेत्री मेहक चहलही 'नागिन'च्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच तिने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून याची माहिती दिली होती. (All PC : @tejasswiprakash/IG)