Faizan Ansari : 'तारक मेहता' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होऊन 23 दिवस झालेत. पण अजूनही त्याच्या बेपत्ता होण्यामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. एकीकडे, पोलिसांच्या टीमने रविवारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटला भेट दिली आणि त्याच्या सहकलाकारांची चौकशी केली. तसेच दुसरीकडे अभिनेत्याचे वडील आणि कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पण दरम्यान, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्युएन्सर फैजान अन्सारी याने मोठा दावा केला आहे. गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होणे हा निव्वळ एक पब्लिसिटी स्टंट असून प्रसिद्धी मिळविण्यासाठी रचलेला डाव असल्याचं त्याने म्हटलं आहे.फैजानने अभिनेता बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची तुलना पूनम पांडेच्या 'बनावट मृत्यू'शी केली आहे.
कोर्टात अनेकदा आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला फैजान अन्सारी मीडियाशी बोलताना म्हणाला, 'मला याबद्दल फारशी माहिती नव्हती, मी ती टीव्ही मालिका जास्त पाहत नाही. माझ्या एका मित्राने माझ्यासोबत एका न्यूज मीडियाची लिंक शेअर केल्यावर मला कळले. गुरुचरण सिंहने दिल्लीत बेपत्ता झाल्याची बातमी जाणीवपूर्वक प्रसिद्ध केली असल्याचं स्पष्ट मतंही त्याने व्यक्त केलं आहे. त्यानंतर त्याने आपला मोबाईल पंजाबमधील एका ठिकाणी सोडला, असंही तो म्हणाला. पुढे त्याने म्हटलं की, हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी केलंय. मला कळतच नाही, की टीव्ही इंडस्ट्रीतील लोक असे का करतात?
'असे लोकं इंडस्ट्रीला लागलेला काळा डाग'
फैजान अन्सारी पुढे म्हणाले, 'यामध्ये किती मेहनत घेतली जाते, याची कल्पना करा, संपूर्ण दिल्ली पोलीस, संपूर्ण पंजाब पोलीस, संपूर्ण मुंबई पोलीस यात गुंतले आहेत. काल पोलिसांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर जाऊन असे का घडले हे जाणून घेतले. प्रसिद्धीसाठी हे जाणूनबुजून करणे अत्यंत चुकीचे असून इंडस्ट्रीला लागेलेला हा डाग आहे. आणखी एक गोष्ट सांगतो की टीव्ही इंडस्ट्रीतील या कलाकारांनी स्वत:ला मोठे सेलिब्रिटी समजू नये.
'मोठा सेलिब्रेटी बनवण्यासाठी असं करतात'
फैजान म्हणाला की, असे लोक स्वत:ला मोठे सेलिब्रिटी बनवण्यासाठी असे प्रकार करत असतात.गुरचरण सिंग सरदार आहे. एक सरदार असून त्याने असं केलं. दरम्यान फैजानच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा देखील सुरु आहे.