Kajol Twinkle Khanna Two Much Show Controversy: अभिनेत्रीपासून (Actress) लेखिका बनलेल्या ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांनी त्यांच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' (Two Much With Kajol and Twinkle) या टॉक शोमध्ये लग्न आणि नातेसंबंधांबद्दल मांडलेल्या मतांनी चांगलीच खळबळ उडवून दिली. यामुळे सोशल मीडियावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अशातच आता दोघींनीही ट्रोलिंग आणि कॉन्ट्रोवर्सीवर (Trolling And Controversy) स्पष्टीकरण दिलंय. ट्विंकल आणि काजोल दोघींनीही स्पष्ट केलंय की, त्यांनी जी-जी वक्तव्य शोमध्ये केली, ती गंमतीनं आणि अगदी हलक्या-फुलक्या अंदाजात केलेली... तसेच, शोच्या सेगमेंटमध्ये डिस्क्लेमर टाकायला हवं होतं, असंही त्यांनी मान्य केलंय. 

Continues below advertisement

काजोल आणि ट्विंकलचं त्यांच्या बेलगाम वक्तव्यांवर स्पष्टीकरण

काजोल आणि ट्विंकलचा शो, 'टू मच' आता संपलाय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बोनस एपिसोडमध्ये, दोन्ही स्टार्सनी त्यांच्या वक्तव्यांमुळे उद्भवलेल्या वादांवर उघडपणे भाष्य केलंय. हा एपिसोड त्यांचा शो प्रसारित झाल्यानंतर शूट करण्यात आलेला. एपिसोडमध्ये, काजोल म्हणाली की, "आता वेळ आली आहे, त्या सेगमेंटची ज्यामुळे आम्हाला सर्वात जास्त अडचणींचा सामना करावा लागलेला... इथे, निव्वळ मज्जा हाच उद्देश आहे... इथे मांडलेली मतं तेवढी महत्त्वाची नाहीत..."

काजोलचं बोलून झाल्यावर ट्विंकल पुढे म्हणाली की, "या भागात एक डिस्क्लेमर असायला हवं होतं. ते पहिल्याच भागापासून लिहायला हवं होतं की, 'या सेगमेंटमध्ये आम्ही जे काही बोलतो, ते गांभीर्यानं घेऊ नका. कृपया या सेगमेंटमध्ये आम्ही दिलेल्या आमच्या कोणत्याही सल्ल्याचं पालन करू नका."

Continues below advertisement

लग्नाला एक्सपायरी डेट... काजोलच्या वक्तव्यावरुन गोंधळ 

काजोल आणि ट्विंकलचा चॅट शो दोघींच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. दोघींनी शोमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी ताशेरे ओढलेले. सोशल मीडियावर सर्वात मोठा गोंधळ काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी लग्न आणि नातेसंबंधांवर केलेल्या टिप्पण्यांमुळे झालेला. यावेळी विक्की कौशल आणि कृती सेनॉन गेस्ट म्हणून आलेले. शोच्या 'दिस ऑर दॅट' या सेगमेंटमध्ये काजोल म्हणालेली की, लग्नाला एक्सपायरी डेट आणि रिस्टार्टचा पर्याय असावा.

फिजिकल चीटिंगलाही सांगितलेलं योग्य... 

दुसऱ्या भागात जान्हवी कपूर आणि करण जोहर होते. त्यात काजोल आणि ट्विंकलनं फसवणूकीवर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, फिजिकल चीटिंग त्यांच्यासाठी 'डील ब्रेकर' नाही. करण म्हणालेला की, "फिजिकल चीटिंग कॉन्ट्रॅक्ट मोडण्यासाठी नाही..." जान्हवीनं उत्तर दिलंय की, "नाही, ती माझ्यासाठी डील मोडणारी आहे." मग ट्विंकल हसली आणि म्हणाली, "आम्ही 50 वर्षांचे आहोत, ती 20 वर्षांची आहे आणि ती लवकरच आमच्या सर्कलमध्ये येईल. तिनं अजून सगळं पाहिलेलं नाही... रात गई बात गई..." 'टू मच' च्या बोनस एपिसोडमध्ये क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्ज आणि शेफाली वर्मा पाहुण्या होत्या. टॉक शोची सुरुवात सलमान खान आणि आमिर खान यांनी केली. त्यानंतर, करण जोहर, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि जान्हवी कपूरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या शोचे सर्व एपिसोड्स Amazon प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kajol On 9 to 5 Job Employees: '9 ते 5 काम करणारे डेस्कवर बसतात, अॅक्टर्स जास्त मेहनत करतात...'; हे काय बोलून गेली काजोल?