Kajol On 9 to 5 Job Employees: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मुद्दा खूप चर्चेत आहे, तो म्हणजे, 9 ते 5 शिफ्ट करणारे जास्त मेहनत करतात की, सेलिब्रिटी... यासाठी कारण ठरलं बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) काजोलचं वक्तव्य. काजोलनं तिच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' (Two Much with Kajol and Twinkle) या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये (Celebrity Chat Show) बोलताना एक वक्तव्य केलं, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. तिनं म्हटलं की, कलाकार 9 ते 5 तास काम करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त मेहनत करतात. काजोलनं ज्यावेळी हे वक्तव्य केलं, त्यावेळी शोमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट आलेले.
कोजलचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच, तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली. रेडिटवर तिला जोरदार ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तिचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशिल असल्याचं म्हटलं. अशातच आता काजोलनं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. तिचं म्हणणं आहे की, 9 ते 5 शिफ्ट करणारे लोक थोडा ब्रेक घेऊ शकतात, चहासाठी किंवा इतर कशासाठीतरी... थोडा आराम करू शकतात, पण कलाकारांना मात्र, हे स्वातंत्र्य नाही. शुटिंगदरम्यान त्यांना सुमारे 12 ते 14 तास त्यांचे 100 टक्के द्यावे लागतात.
काजोल काय बरळून गेली? पाहूयात सविस्तर... (Kajol Controversial Statement)
अभिनेत्री काजोल म्हणाली की, "आपल्याला काम करताना खूप अॅक्टिव्ह व्हावं लागतं. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला 100 टक्के द्वावे लागतात. आपल्यापैकी काही जण त्यांचे 100 टक्के देतात. पण जेव्हा मी एका सिनेमाचं शूटिंग करत असते. तेव्हा सलग शूटिंग असतं. आता लीगल ड्राम द ट्रायलच्या दुसऱ्या सीझनसाठी 35-40 दिवसांचं शूटिंग होतं. मला रोज लवकर उठावं लागत होतं. व्यायामही करायचा असतो. तुमचं जेवण योग्य असलं पाहिजे आणि वेळेत आलं पाहिजे. कारण, एक इंचही वजन तुम्ही वाढवू शकत नाही. कारण मग तुम्हाला कपडे व्यवस्थित होणार नाहीत. हा एकप्रकारे दबाव असतो. ही एक मोठी गोष्ट आहे, असं मला वाटतं", असं काजोल म्हणाली.
काजोल म्हणाली की, "अभिनय करत असलो तरी इव्हेंटसाठीही जावं लागतं. 12-14 तास अॅक्टिव्ह राहणं हे कठीण काम आहे. 9 ते 5 काम करणारे डेस्कवर बसलेले असतात. त्यामुळे तुम्हाला तिथे पूर्ण वेळ देण्याचीही गरज नसते. तुम्ही टी ब्रेक घेऊ शकता, आराम करू शकता, खेळू शकता, कंटाळा आला तर फेरफटकाही मारू शकता... आणि त्यासोबतच तुम्ही तुमचं कामंही करता. मी असं नाही म्हणत की, आम्ही टी किंवा कॉफी ब्रेक घेत नाही. पण आम्ही तुमच्यासारखं करू शकत नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :