Horoscope Today 28 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 28 नोव्हेंबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात, घरामध्ये काही व्यक्तींसाठी त्याग करावा लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती बरी राहिली तरी, ऐपत असूनही काही गोष्टींबाबत उदासीन राहाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी एरवी पेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील, महिलांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाही
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे जास्त निराश व्हाल, परंतु परिपूर्ण अचूक काम करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज मागचा अनुभव पाठीशी ठेवून योग्य निर्णय घ्याल, घरामध्ये दुरुस्तीची बारीक सारी कामे निघतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज दूरच्या प्रवासाचे योग येतील, वैवाहिक जीवनामध्ये क्षुल्लक कारणावरून खटके उडतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज सगळीकडे सामंजस्याचे धोरण स्वीकारावे लागेल, व्यवसाय धंद्यात गुंतवणुकीचे काही पर्याय खुले असतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे सविस्तर ठरेल, नोकरीमध्ये जबाबदारीचे काम deऊन वरिष्ठ तुमची परीक्षा पाहतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज हातातील पैसा अनावश्यक कारणास्तव खर्च होईल, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज व्यवसायात अशक्य काही नाही याचा उलगडा होईल, कामाबाबत स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज चिकाटी निश्चय धैर्य आणि जिद्द या चार गोष्टींच्या जीवावर कामाला बरीच गती येईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल, या सगळ्याच्या जोरावर मिळालेल्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात आहे.
हेही वाचा
Weekly Horoscope: डिसेंबरचा पहिला आठवडा नशीब पालटणारा! 12 राशींसाठी कसा जाणार? पैसा, करिअर, प्रेम जीवन? कोण होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)