Web Series Based On True Stories: हल्ली दर मिनिटाला म्हटलं तरीसुद्धा एक नवा मूव्ही (Films) किंवा सीरिज (Web Series) ओटीटीवर रिलीज (OTT Released) झालेली असते. सध्याच्या असंख्य ओटीटीट प्लॅटफॉर्म्सवर (OTT Platforms) कित्येक वेब सीरिज उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या जॉनरच्या... काही क्राईम थ्रिलर (Crime Thriller), काही सस्पेन्स थ्रिलर (Suspense Thriller) तर काही मनोरंजनापेक्षाही अधिक वास्तवाची झलक सर्वांसमोर मांडतात. भारतात अशा अनेक सीरिज आहेत, त्या खऱ्याखुऱ्या, गाजलेल्या घटनांवर आधारित आहेत. कधी त्या देशातल्या मोठ्या घोटाळ्याची कथा सर्वांसमोर मांडतात. तर, कधी शूरवीरांची कथा सर्वांना सांगतात... तर कधी सत्य सर्वांसमोर मांडतात. या सीरिजनी केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर लोकांना आपल्या जगात काय-काय घडतंय? यावर विचार करायला भाग पाडलं. जाणून घेऊयात, अशा काही सीरिज... 

Continues below advertisement

1. स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी (Scam 1992 The Harshad Mehta Story)

हंसल मेहता यांची ही सीरिज हर्षद मेहताची कहाणी सांगते, जो एक सामान्य स्टॉक ब्रोकर होता, ज्यानं 1990 च्या दशकात भारतीय शेअर बाजाराला हादरवून टाकलेलं. त्याचा धूर्तपणा आणि यशामुळे तो शेअर मार्केटचा 'बिग बुल' बनला, पण, नंतर त्याच्या स्वतःच्या चुकांमुळेच तो जेवढ्या झटपट यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला, तेवढ्याच वेगानं खाली आला. लोभ आणि महत्त्वाकांक्षा एखाद्या व्यक्तीला दिल्यावरही सर्वकाही कसं हिरावून घेऊ शकतं, हे या सीरिजमधून दिसून येतं.

Continues below advertisement

2. दिल्ली क्राईम (Delhi Crime)

ही सीरिज 2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित आहे. दिल्ली पोलिसांनी या भयानक गुन्ह्याचा कसा तपास केला? हे यात दाखवलं गेलंय. डीसीपी वर्तिका चतुर्वेदी म्हणून शेफाली शाहनं दमदार काम केलंय.

3. रॉकेट बॉयज (Rocket Boys)

रॉकेट बॉईज ही सीरिज दोन महान भारतीय शास्त्रज्ञ, डॉ. होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारताच्या विज्ञान आणि अंतराळ भविष्याला कसे आकार दिला हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलंय. प्रेरक आणि भावनिक कथेसह, ही सीरिज तरुणांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास प्रोत्साहित करते.

4. द फॉरगॉटन आर्मी-आजादी के लिए (The Forgotten Army - Azaadi ke liye)

ही सीरिज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मी (INA) ची कहाणी सांगते. कबीर खान दिग्दर्शित ही सीरिज स्वातंत्र्यलढ्यात सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करते, ज्यांच्या कथा इतिहासात हरवल्या आहेत.

5. शिक्षा मंडल (Shiksha Mandal)

ही सीरिज मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यावर आधारित आहे, ज्यामध्ये सरकारी परीक्षा आणि भरतींमध्ये व्यापक भ्रष्टाचार झाला होता. हा शो शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रालाही लोभ आणि राजकारणानं कसं सोडलं नाही यावर प्रकाश टाकतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

धनुषच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'या' 7 धमाकेदार फिल्म्स; पाहिल्या नसतील तर झटपट संपवून टाका!