Salman Khan : बरेच दिवस चाहते त्यांचा लाडका ‘दबंग खान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाची वाट पाहत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, नुकतीच निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. पूजा हेगडे आणि सलमान खान अभिनीत हा चित्रपट यावर्षी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या बर्थडे वीकमध्ये प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज मिळणार आहे.


सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यापूर्वी 2023मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 2023 मध्ये नाही, तर याच वर्षी म्हणजेच 2022 मध्ये रिलीज होणार आहे.



‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


सलमान खान आणि पूजा हेगडे स्टारर या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. साजिद नाडियादवालानिर्मित ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सलमान खानच्या बर्थडे वीकमध्ये प्रदर्शित होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.


सलमान खान 'कभी ईद कभी दिवाली'नंतर ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यानंतर तो ‘किक 2’ या चित्रपटातही दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो ‘दबंग 4’ आणि ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्येही काम करणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha