Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’(Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील 'जब सैंया' (Jab Saiyaan) हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्यात आलिया भट आणि शांतनु महेश्वरी (Shantanu Maheshwari) या दोघांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. गाण्यातील आलिया आणि शांतनु यांच्या केमिस्ट्रला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की हा शांतनु महेश्वर नक्की कोण आहे? जाणून घेऊयात त्याच्याबद्दल...
गंगूबाई काठियावाडी हा शांतनुचा पहिला चित्रपट आहे. याआधी शांतनुनं छोट्या पडद्यावरील शोमध्ये काम केलं आहे. 'दिल दोस्ती डान्स' या शोमुळे शांतनुला विशेष लोकप्रियता मिळाली. या शोमधून त्यानं अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. तसेच नच बलिए सिझन 9 मध्ये देखील शांतनुनं भाग घेतला होता. खतरो के खिलाडी या शोच्या आठव्या सिझनचा शांतनु विजेता आहे.
शांतनुच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. आता 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामधील शांतनुचा अभिनय पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
हेही वाचा :
- Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, समंथाच्या लूकने लावले चारचॉंद
- Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित
- Samantha : नेटकऱ्याचा अजब सवाल ; समंथा म्हणाली, 'आधी गूगलवर सर्च कर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha