South Blockbuster Movie : एखादा चित्रपट फ्लॉप, हिट, सुपरहिट की ब्लॉकबस्टर (Blockbuster) ठरतो, हे प्रेक्षकांच्या हातात असतं. अनेकवेळा सुपरस्टार्सच्या बिग बजेट चित्रपटांचं कलेक्शन बॉक्स ऑफिसवर (Box Office) पछाडलं आहे. तर काही वेळा लहान अॅक्टर्सचे कमी बजेटचे चित्रपट प्रेक्षकांना इतके आवडतात की, ते नवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहेत. डंकी आणि सालारला टक्कर देणाऱ्या 45 कोटी रुपयांच्या चित्रपटाबाबतही असंच काहीसं घडलं, ज्यानं कोणत्याही प्रमोशन किंवा धूमधडाक्याशिवाय बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली. एवढंच नाही तर 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. पण मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्याला हे यश साजरं करण्याची संधीही मिळाली नाही, कारण एका कॉन्ट्रोवर्सीमुळे या दिग्गज अभिनेत्याला तुरुंगवास भोगावा लागला. एवढंच नाही तर, 2024 मध्येही तो चित्रपटामुळे नाही तर त्याच्यासोबतच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेचा विषय ठरला.
या चित्रपटाचे नाव 'काटेरा' होतं, जो 29 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात कन्नड स्टार दर्शन मुख्य भूमिकेत होता. पॉझिटिव्ह रिव्यू आणि प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम यामुळे या चित्रपटाची कमाई 60 कोटींवर गेली. तर एकूण कलेक्शन 104.58 कोटी रुपये होतं. 1970 च्या दशकात कर्नाटकातील एका गावातल्या वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटाच्या कथेत दर्शन मुख्य भूमिकेत होता. तर, तरुण सुधीर दिग्दर्शित या ॲक्शन चित्रपटात जगपती बाबू, कुमार गोविंद, विनोद कुमार अल्वा, दानिश अख्तर सैफी आणि श्रुती या कलाकारांनी चित्रपटाच्या कथेला पाठिंबा दिला आहे. रिलीजनंतर हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी ZEE5 OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अभिनेता अटकेत
अभिनेता दर्शनबद्दल सांगायचं झालं तर, आपल्याला माहीत आहे की, अभिनेता रेणुकास्वामी खून आणि अपहरण प्रकरणात तुरुंगात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रेणुकास्वामी या चित्रदुर्गाच्या रहिवासी होत्या, ज्यांचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप कन्नड अभिनेता दर्शनसोबत त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांवर होता. या आरोपावरून अभिनेता दर्शन, पवित्रा गौडा आणि अन्य 15 आरोपींना 11 जून रोजी अटक करण्यात आली होती. चाहत्यानं पवित्रा यांना घाणेरडे आणि अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.
बंगळुरू सेंट्रल जेलमधील स्टारच्या शाही व्यवहाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर अभिनेत्याला बेल्लारी तुरुंगात हलवण्यात आलं. दर्शनाविरुद्ध तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, त्याला 30 ऑक्टोबर 2024 रोजी मणक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :