K Pop Singer Bo Ram death :  साऊथ कोरियाची प्रसिद्ध गायिका पार्क बो राम (Bo Ram) हिचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. ही के-पॉप गायक फक्त 30 वर्षांची होती. दरम्यान तिच्या मृत्यूच्या बातमीमुळे संपूर्ण इंडस्ट्री आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलं नाहीये. पार्क तिच्या करिअरमध्ये लवकरच 10 वर्षे पूर्ण करणार होती आणि ती एका सेलिब्रेशनची देखील तयारी करत होती. ती तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओवर काम करत होती, पण त्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला.


XANADU एंटरटेनमेंटने सांगितले की, आम्ही अत्यंत दुःखद बातमी शेअर करत होता. पार्क बो राम हिचे 11 एप्रिल रोजी निधन झाले. दरम्यान ही बातमी ऐकताच सर्वांना एकच धक्का बसला आहे. तसेच तिच्या पार्थिवावरही लवकरच अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 










मित्रांसोबत पार्टीत दंग होती के-पॉप सिंगर


'AllKpop' च्या अहवालात असे म्हटले आहे की,  नामयांगजू पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एक अहवाल दाखल केला आहे.  ज्यात दावा केला आहे की पार्क बो राम तिच्या मृत्यूच्या काही तास आधी एका पार्टीत होती. तसेच ती पार्टीत दारुचे देखील सेवन करत होती, अशी माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार,  रात्री 9:55 वाजता वॉशरूममध्ये ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यावेळी तिला मृत घोषित करण्यात आले.                                        






ही बातमी वाचा : 


Himachal Congress Candidate List: मंडीमध्ये कंगनाला तगडं आव्हान, काँग्रेसनं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उतरवलं लोकसभेच्या रिंगणात