Jug Jugg Jeeyo Box Office Collection : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट आज (24 जून) प्रदर्शित झाला आहे. अनेक लोक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात होते. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया- 2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. नंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस आला. अनेक ट्रे़ड अॅनालिस्ट असा अंदाज लावत आहेत की जुग जुग जियो हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकतो. ओपनिंग-डेला हा चित्रपट जवळपास 10 कोटींची कमाई करेल असा अंदाज लावला जात आहे. तर वीकेंडपर्यंत हा चित्रपट 35 ते 40 कोटींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. भूल भुलैया-2 या चित्रपटानं ओपनिंग-डेला 14.11 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे भूल भुलैया-2 या चित्रपटाला मागे टाकून जुग जुग जियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
'जुग जुग जियो' या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच धर्मा प्रोडक्शन, वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जुग जुग जियो या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी सुपरस्टार सिंगर 2 या शोमध्ये देखील हजेरी लावली होती. 'जुग जुग जियो' 'रंगसारी', 'नाच पंजाबन' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यूट्यूबर प्राजक्ता कोळी आणि मनीष पॉल हे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
हेही वाचा: