Kiara Advani Varun Dhawan Jug Jugg Jeeyo Song Rangisari Released : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि अनिल कपूरच्या (Anil Kapoor) 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता सिनेमातील 'रंगसारी' (Rangisari) हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात वरुण धवन आणि कियारा आडवाणी रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 


'रंगसारी'मध्ये वरुण-कियाराचा रोमॅंटिक अंदाज


वरुण धवन आणि कियारा आडवाणीने अनेक सिनेमांत एकत्र काम केले आहे. आता 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून ते रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 'जुग जुग जिओ' सिनेमातील 'रंगसारी' गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. कनिष्क सेठ आणि कविता सेठने हे गाणं गायले आहे. सिनेमात वरुण आणि कियारा पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 






'नाच पंजाबन' गाण्याने घातला धुमाकूळ


'जुग जुग जिओ' सिनेमातील 'रंगसारी' हे दुसरे गाणं आहे. याआधी 'नाच पंजाबन' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. अवघ्या काही दिवसांतच हे गाणं सुपरहिट झालं होतं. या सिनेमात वरुण धवन, कियारा आडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर व्यतिरिक्त यूट्यूबर प्राजक्ता कोळी आणि मनीष पॉलदेखील दिसून येणार आहेत. करण जोहर प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. तर राज मेहता यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


24 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


कोरोनामुळे या सिनेमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. शूटिंगदरम्यान सिनमातील कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. आता हा सिनेमा 24 जून 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नीतू कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Jug Jugg Jeeyo Trailer : 'जुग जुग जिओ' ट्रेलर रिलीज; प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत


Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चे मोशन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित