Jug Jugg Jeeyo : प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu kapoor) यांचा जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट 24 जून रोजी रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम या सिनेमाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं (karan Johar) केली आहे. पण जुग जुग जियो चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाचं स्क्रीनिंग हे कोर्टामध्ये करण्याचा आदेश रांची कोर्टानं दिला आहे.
रांची येथील लेखक विशाल सिंहनं धर्मा प्रोडक्शनवर कथा चोरी करण्याचा आरोप लावला आहे. विशाल सिंहनं या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी रांची कोर्टाने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयात त्याचे स्क्रीनिंग करण्याचा आदेश दिला आहे.
रांची येथील लेखक विशाल सिंहनं आपल्या याचिकेत म्हटले आहे की, जुग जुग जिओ या चित्रपटाची कथा ही त्याच्या बन्नी रानी कथेसारखी आहे. विशाल सिंहची कथा ही परवानगीशिवाय आणि क्रेडीट न देता वापरण्यात आली आहे, असं विशालचं मतं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, असंही विशालनं याचिकेत म्हटलं आहे. विशालनं चित्रपटाच्या निर्मात्यांकडे दीड कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे.
21 जून रोजी होणार स्क्रीनिंग
कोर्टामध्ये जुग जुग जिओची स्क्रीनिंग ही 21 जून रोजी होणार आहे. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन निर्मात्यांनी केले आहे की नाही, याबाबत चित्रपट पाहिल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आगे. तसेच दोन्ही पक्षांची बाजू कोर्टात मांडण्यात येणार आहे.
जुग जुग जियो हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच धर्मा प्रोडक्शन, वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.