Johnny Depp : गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारा हॉलिवूडचा स्टार जॉनी डेप (Johnny Depp) हा नुकताच एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. जॉनी आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यातील मानहानीचे प्रकरण बरेच दिवस चालले होते. हे प्रकरण सतत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिले होते. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिल. जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. नुकतीच जॉनीनं त्याच्या काही मित्रांसोबत इंडियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली. जॉनीनं या रेस्टॉरंटमध्ये अनेक भारतीय पदार्थांवर ताव मारला. 


जॉनी डेप आणि गिटार वादक जेफ बेक हे मित्र आहेत. नुकतेच दोघेही इंग्लंडमध्ये एका म्युझिक टूर दरम्यान एकत्र दिसले होते. त्यानंतर आता दोघांनी बर्मिंघममधील वाराणसी या भारतीय रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या मित्रांसोबत जेवण केलं. या रेस्टॉरंटमध्ये जॉनीनं 49 लाख रुपये खर्च केले.


भारतीय पदार्थांवर मारला ताव 
बटर चिकन, पनीर टिक्‍का, लॅम्‍ब कडाही आणि किंग प्रॉन भुना या पदार्थांवर जॉनी आणि त्यांच्या मित्रानं ताव मारला. तसेच त्यांनी नान, भात आणि सॅलेड देखील ऑर्डर केले होते. 






जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यात दोषी ठरवले आणि निर्णय दिला की, जॉनी डेप यांनी आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान असे एकूण 15 दशलक्ष डॉलर भरण्याचे आदेश दिले.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


हेही वाचा :