Jina haram Kar Diya : अभिनेत्री नोरा फतेहीचे (Nora Fatehi)'जीना हराम कर दिया' हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विद्युत जामवाल (Vidyut Jammwal)आणि नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) क्रॅक या सिनेमातील दुसऱ्या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यात विद्युत जामवाल आणि नोरा फतेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हे गाणे विशाल मिश्रा आणि शिल्पा राव यांनी गायले आहे. यापूर्वी निर्मात्यांनी क्रॅक या सिनेमातील 'दिल झूम' हे गाणे प्रदर्शित केले होते. क्रॅक हा अॅक्शन सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. 


विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal) 'क्रॅक-जीतेगा तो जिएगा' या सिनेमाचे शूटींग सुरु आहे. विद्युत नोरासोबत (Nora Fatehi) पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. नोरा अभिनेत्री म्हणून या सिनेमातून पदार्पण करणार आहे. क्रॅक या सिनेमातील पहिले गाणे रिलीज झाल्यानंतर आता सिनेमा कधी रिलीज होणार? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


क्रॅक सिनेमाच्या टिझरमध्ये काय दाखवण्यात आलय? 


‘क्रॅक-जीतेगा तो जिएगा’च्या टीझरची सुरुवात डायलॉगने होते. 'जिंदगी तो सबके साथ खेलती है, लेकिन असली प्लेयर वही है जो जिंदगी के साथ खेले' असा डायलॉग टिझरच्या सुरुवातीलाच घेण्यात आलाय. पुढे विद्युत जामवालचे (Vidyut Jammwal) जबरदस्त अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. स्किटिंग करत असताना फायटिंग ते डोंगर लढत असतानाचे थ्रिल टीझरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. विद्युतने आजवर अॅक्शन आणि स्टंटच्या माध्यमातून सिनेमात स्वत:ला प्रेझेंट केले आहे. इंडस्ट्रीत त्याच्यासारखे स्टंट फार कमी लोकांना जमतात. 



विद्युत जामवालने 2021 मध्ये सुरु केले होते प्रॉडक्शन हाऊस 


अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) याने 19 एप्रिल 2021 मध्ये 'अॅक्शन हीरो फिल्म्स' या नावाने प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते. यावेळी बोलताना जामवाल म्हणाला होता की, जागतिक सिनेमामध्ये 'अॅक्शन हीरो फिल्म्स'च्या पदचिन्हाची स्थापना करण्याची इच्छा आहे. मला नेहमी साथ देणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. हे जेवढे माझे यश आहे, तेवढेच त्यांचे देखील आहे. विद्युत जामवालने शक्ती या तेलगू सिनेमाच्या माध्यमातून सिनेक्षेत्रात पाऊल ठेवले. 2011 मध्ये त्याचा फोर्स हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 



Republic Day 2024 Songs : 'ऐ वतन' ते 'तेरी मिट्टी' पर्यंत, प्रजासत्ताकदिनी ऐका देशभक्तीवर आधारित 'ही' गाजलेली गाणी