Jatra 2 : अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि विजय कदम (Vijay Kadam) यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘जत्रा’ (Jatra) या चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. आता या चित्रपटाला जवळपास 16 वर्षे झाली आहे. मात्र, आजही या चित्रपटाची जादू कायम आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून बघतात. ‘जत्रा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदू नववर्षाचं निमित्त साधत ‘जत्रा’च्या टीमने ‘जत्रा 2’ची घोषणा केली आहे.


अभिनेते भरत जाधव यांनी ‘जत्रा 2’चं एक टीझर पोस्टर शेअर करत चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी दिली आहे.


पाहा पोस्ट :



‘ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला १६ वर्षाहून जास्त काळ लोटलाय.. कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे!


म्हणूनच ह्या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय..


ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला 'जत्रा 2' येतोय! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! अलबत्या गलबत्या कोण फोडेल.....’, असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.


'जत्रा' हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर यांच्यासोबतच कुशल बद्रिके, संजय खापरे यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी 'कोंबडी पळाली' आणि 'ये गं ये ये मैना' तुफान गाजली होती. या चित्रपटाच्या उदंड यशानंतर आता नववर्षात 'जत्रा 2' सर्वांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha