Jalsa Trailer Out:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. कहानी असो वा शेरनी विद्याच्या प्रत्येक चित्रपटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. तिच्या जलसा (Jalsa) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. चित्रपटात विद्या बालनसोबतच  शेफाली शाह (Shefali Shah), रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), इकबाल खान (Iqbal Khan), विधात्री बंदी (Vidhatri Bandi), श्रीकांत यादव (Shrikant Yadav), शफीन पटेल आणि सूर्या कसीभटला हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


जलसा या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुरेश त्रिवेणी (Suresh Triveni) यांनी केले असून टी सीरिज आणि अबुदंतिया एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात विद्या ही माया नावाची भूमिका साकारणार आहे तर शेफाली रूक्साना या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे कथानक हे या दोन भूमिकांवर आधारित असणार आहे. 






चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी या चित्रपटाबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'जलसा चित्रपटाचे कथानक एका रहस्यमय कथेवर आथारित आहे. मी प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या आणि त्यांच्यासोबत कनेक्ट होणाऱ्या चित्रपटाची निर्मीती करायचा प्रयत्न नेहमी करतो.  ' विद्या बालनने मुलाखतीमध्ये या चित्रपटाबद्दल सांगितले की, ज्या चित्रपटात काम करते त्या चित्रपटाचे कथानक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते.' जलसा हा चित्रपट 18 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha