The Family Man Season 3 Cast: 'द फॅमिली मॅन'चा (The Family Man Season 3) या बहुचर्चित सीरिजचा सीझन लवकरच येणार आहे. या सीझनची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या सीरिजमध्ये आणखी एका नव्या स्टारची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच या सीरिजच्या शुटींगलाही सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. 


या सीरिजमध्ये आता जयदीप अहवालचीही एन्ट्री होणार आहे. आतापर्यंत अनेक सीरिजच्या माध्यमातून जयदीपने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे फॅमिली मॅनमधील एन्ट्रीचीही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच जयदीप नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही.


द फॅमिली मॅनमध्ये होणार जयदीप अहलावतची एन्ट्री


बॉलिवुड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार, द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप अहलावतची एन्ट्री झालेली आहे. त्यामुळे या सीरिजच्या तिसऱ्या भागात मनोज वाजपेयीसोबत जयदीप अहलावतही दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जयदीप अहलावतने कास्टला जॉईन केलं असून शूटींगलाही सुरुवात झाली आहे. 


फॅमिली मॅनच्या शुटींगला सुरुवात


रिपोर्ट्सनुसार, नागालँडमध्ये फॅमिली मॅनच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. ही सीरिज 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता हा सीझन कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.                                                         


श्रीकांत तिवारीची व्यक्तीरेखा संपणार...


2019 मध्ये लॉन्च 'द फॅमिली मॅन' वेब सीरिज लाँच झाली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रियामणी ही मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर शारीब हाश्मी हा त्याचा सहकारी दाखवण्यात आला  आहे. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूने आपल्या निगेटिव्ह भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आता, तिसऱ्या सीझनमध्ये  सुचित्रा तिवारीच्या भूमिकेत प्रियमणी, जेके तळपदेच्या भूमिकेत शरीब हाश्मी, धृती तिवारीच्या भूमिकेत अश्लेषा ठाकूर आणि अथर्व तिवारीच्या भूमिकेत वेदांत सिन्हा यांच्यासह अनेक कलाकार पुन्हा एकदा झळकणार आहेत. राज-डीके यांची ही वेब सीरिज कॉमेडी आणि स्पाय थ्रिलरचा यांचा मेळ आहे. 


ही बातमी वाचा : 


Amitabh Bachchan : सुदेश भोसलेंनी अमिताभ यांना सांगितली 'ती' चूक, पुन्हा व्हिडीओ शेअर करत बिग बी म्हणाले...