Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सोशल मीडियावर पोस्ट हल्ली बऱ्याच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असतात. पण त्यांचा सध्याचा सोशल मीडियावरचा एक व्हिडीओ बराच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमधली एक चूक लक्षात येताच अमिताभ यांनी पुन्हा एकदा माफी मागितल्याचा व्हिडीओ शेअर केलाय.
दरम्यान अमिताभ यांच्याकडून एका शब्दाचा उच्चार चुकला होता. त्यांची ही चूक सुदेश भोसले यांनी लक्षात आणून दिली. त्यामुळे या व्हिडीओमध्ये अमिताभ यांनी सुदेश भोसले यांचे देखील आभार मानले आहेत. अमिताभ यांच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनाही कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलंय.
अमिताभ यांचा आधीचा व्हिडीओ काय होता?
अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मी कचरा करणार नाही, असं म्हणत चाहत्यांना देखील कचरा न करण्याचं आवाहन केलं. पण त्यामध्ये त्यांनी कचरा या शब्दाचा चुकीचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. पण ती चूक लक्षात येताच अमिताभ यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत त्यांची चूक मान्य केली आणि ती दुरूस्तही केली.
अमिताभ यांनी मागितली माफी
अमिताभ यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'नमस्कार. मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता. मी कचरा करणार नाही, असं मी मराठीमध्ये म्हणालो होतो. पण मराठी बोलताना मी कचरा या शब्दाचा चुकीचा उच्चार केला होता. माझे मित्र सुदेश भोसले यांनी माझी चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे मी पुन्हा हा व्हिडिओ करतोय. मी कचरा करणार नाही.'