Shikhar Pahariya : अभिनेत्री जान्हवी कपूर (Jahnavi Kapoor) हिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया (shikhar pahariya) हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधून शिखर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच त्याला महाराष्ट्रातील गाजलेल्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं असं म्हटलं जातंय.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिंदे कुटुंबाचं राजकीय बळ आहे. यात मतदारसंघातून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या तीन टर्म आमदार राहिल्या आहेत. त्यामुळे याच मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना दिल्लीची दारं खुली झालीत. त्यामुळे शिखरलाही याच मतदारसंघातून विधानसभेची दारं खुली होतील अशा चर्चा होत्या. पण आता प्रणिती शिंदे या खासदार असल्याने या मतदारसंघातून कोण उभं राहणार असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आणि सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
म्हणून शिखरच्या निवडणुकीच्या चर्चा
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अवघ्या काही दिवसांमध्ये वाजणार आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून कसोशीचा प्रचार करण्यात येतोय. त्यातच शिखरचेही सोलापूर जिल्ह्यात दौरे वाढले असल्याच्या चर्चा आहेत. त्याचप्रमाणे शिखरने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी वाढवल्या असल्याचंही म्हटलं जातंय. त्यामुळे शिंदे कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेला या मतदारसंघातून पुन्हा शिंदेंचीच तिसरी पिढी निवडणुकांच्या रिंगणात उतरणार का याकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोण आहे शिखर पहाडिया?
शिखर हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती पहाडिया यांचा मोठा लेक आहे. त्याचप्रमाणे शिखर हा मुंबईतील एक सर्वश्रुत बांधकाम व्यावसायिक आहे. मागील अनेक दिवसांपासून शिखर आणि जान्हवी डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनीही त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने भाष्य केलं आहे. पण अद्याप त्यांच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिखर हा पहिल्यांदा जानेवारीमध्ये झालेल्या सिद्धेश्र्वर महायात्रेमुळे बराच चर्चेत आला होता.
ही बातमी वाचा :
'गारुड' चित्रपटातील रहस्य उलगडण्यात गिरीश कुलकर्णी आणि शशांक शेंडेंचा मोठा वाटा, नक्की काय घडणार?