Jackie Shroff : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हा 'बॉलिवूडचा भिडू' म्हणून ओळखला जातो. विनोदी शौलीनं तो अनेकांची मनं जिंकतो. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये जॅकीनं फिटनेसबाबत सांगितलं. यावेळी जॅकीनं थॅलेसेमिया या डिसॉर्डरबाबत माहिती दिली.
प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल (23 मे) पार पडला. जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तक आहे. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता जॅकी श्रॉफ हे उपस्थितीत होते. लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला होता. कर्यक्रमामध्ये जॅकीनं त्याच्या विनोदी शैलीमध्ये उपस्थित लोकांना फिटनेसबाबत सांगितलं.
जॅकी म्हणाला,'मला राजनं खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतो. महाराष्ट्रात राहतो तर मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे. स्पष्ट बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो. माझा मित्र आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज हा ट्रेंड चेंजर आहे. तो खूप तरुण दिसतो.'
फिटनेसबाबत जॅकी म्हणाला, 'डॉक्टर हे देवासारखे असतात. लहान मुलांना ते सांभाळतात. आपण आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण जे त्यांना खायला देतो, त्याचा परिणाम हा त्यांच्या शरीरावर होत असतो. जसे झाड लावण्यासाठी बी पेरावं लागतं तसंच. त्यामुळे फ्राइड फूड जास्त खाणं टाळावं लागतं. श्वासाकडे देखील विशेष लक्ष द्या.'
पुढे जॅकी म्हणाला, 'कॅलरी कमी होत आहे का? हे बघण्यापेक्षा फॅट कमी होत आहे का? हे देखील पाहिलं पाहिजे. हे आपल्याला कोण सांगणार. आम्ही मेतकुट भात खाणारी, आंबा खाणारी माणसं आहोत. स्वत:च्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.'
थॅलेसेमियाबाबत दिली माहिती
जॅकी श्रॉफनं थॅलेसेमिया या डिसॉर्डरबाबत माहिती दिली आहे 'थॅलेसेमिया हा एक ब्लड डिसॉर्डर आहे. जर नवरा आणि बायको या दोघांनाही हा डिसॉर्डर असेल तर त्यांंच्या मुलांना देखील थॅलेसेमिया होऊ शकतो. त्यामुळे लग्न करताना पत्रिका पाहण्याबरोबरच थँलिसेमियाचं चेक-अप देखील करावं.'
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या