Vijay Deverakonda On Vicky Kaushal Chhaava Movie: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा'नं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर 800 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा 'छावा'मधून रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आलीय. पण, या चित्रपटामुळे अनेक वादांनाही तोंड फुटलं आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासूनच औरंगजेब (Aurangzeb) आणि मुघल (Mughals) यांच्यावरुन बराच काळ वाद-विवाद सुरू होते. एवढंच काय तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनंही 'छावा' (Chhaava) सिनेमा आणि औरंगजेबामुळे गाजलं होतं. सर्वसामान्यांपासून अगदी राजकारण्यांपर्यंत अनेकांनी वक्तव्य केलं. ज्याचा परिणाम थेट देशाच्या संसदेपर्यंत झाल्याचं दिसून आलं. अशातच आता साऊथ सुपरस्टार (South Superstar) विजय देवरकोंडानं (Vijay Deverakonda) एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा 'छावा' चर्चेचा विषय बनला आहे. 

साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडानं नुकतीच हैदराबादमध्ये सूर्याच्या आगामी 'रेट्रो' सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली आणि त्यावेळी विचारण्या आलेल्या काही प्रश्नांना दिलेल्या इंटेंस रिअॅक्शननं सर्वांना हादरवून सोडलं. 

ज्यावेळी होस्टनं विजय देवरकोंडाला विचारलं की, जर त्याला भूतकाळात परत जायचं असेल, तर त्याला कोणत्या ऐतिहासिक व्यक्तींना भेटायला आवडेल. त्यावेळी विजयनं अजिबात कोणताही संकोच न बाळगता उत्तर दिलं की, त्याला ब्रिटीशांना शब्दांसोबत नाहीतर दोन कानफाटात मारून भेटायचं आहे. तसेच, यावेळी त्यानं विक्की कौशल आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' सिनेमाचाही उल्लेख केला. तसेच, सिनेमा पाहून आपण खूपच प्रभावित झाल्याचंही त्यानं सांगितलं.  

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा म्हणाला की, "मला ब्रिटीशांना भेटायचंय आणि त्यांना दोन जोरदार कानशिलात लावायच्यात. मी हल्लीच 'छावा' पाहिला, त्यानंतर माझा संताप अनावर झाला. कदाचित मी औरंगजेबालाही दोन ते तीन जोरदार कानफाटात मारीन. मला अशा अनेकांना भेटायचं आहे, ज्यांना मला फक्त मारायचं आहे. आतातरी माझ्या डोक्यात हेच आहे."

विजय देवरकोंडाला 'या' अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर करायचीय 

विजय देवरकोंडाच्या उत्तरानंतर, त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या सूर्यालाही तोच प्रश्न विचारण्यात आला आणि त्यानं उत्तर दिलं की, भूतकाळ कोणालाही आठवत नाही, म्हणून त्याला माहीत नाही की, त्याला भूतकाळात परत जाऊन कोणाला भेटायचं आहे. नंतर, विजयला विचारण्यात आलं की, जर त्याला भूतकाळात परत जायचं असेल तर त्याला कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल? विजयनं क्षणाचाही विलंब न लावता श्रीदेवी, रम्या कृष्णन किंवा विजयशांती या अभिनेत्रींची निवड करण्याऐवजी सिमरन आणि सोनाली बेंद्रे यांची निवड केली. त्यानं ज्योतिकाचंही नाव घेतलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Director Shameless Demand To Actress: 'कपडे काढ आणि इनरवेअरमध्ये माझ्यासमोर येऊन बस...'; प्रसिद्ध दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा