Isha Ambani Met Gala Look 2025: शाहरुख खान (Shahrukh Khan), दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्याव्यतिरिक्त, मेट गाला 2025 (Met Gala 2025) मधील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची लाडकी लेक ईशा अंबानीचा (Isha Ambani) लूकही खूप व्हायरल (Photo Viral) होत आहे. अंबानी कुटुंबाची लाडकी लेक इशा अंबानीसुद्धा बॉलिवूड कलाकारांसोबत मेट गालामध्ये सहभागी झालीय. ईशाचा लूक चर्चेचा विषय ठरतो, पण त्यासोबतच तिनं गळ्यात घातलेल्या शाही नेकलेसची चर्चा जास्त होत आहे. ईशानं गळ्यात घातलेला शाही नेकलेस तिच्या आईचा असून त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. 

Continues below advertisement


ईशा अंबानीचा मेट गाला लूक सोशल मीडियावर ट्रेंड 


यावेळी, ईशा अंबानीनं मेट गालामध्ये 'टेलर्ड फॉर यू' (Tailored for U) या थीमवर आधारित लूक केलाय. या लूकमध्ये ईशा अंबानी पूर्णपणे राजकुमारीसारखी दिसतेय. ईशाचा ड्रेस अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलाय. मेट गालामध्ये ईशानं काळ्या बेलबॉटम पँटसह हॉल्टर स्टाईल टॉप वेअर केलाय. तिनं हा लूक एका लांब श्रग जॅकेटनं कम्प्लिट केलाय.






ईशानं वेअर केलेला शाही हार, तिच्या आईचा...


सोशल मीडियावर ईशाच्या लूकपेक्षा तिचा हिऱ्यांच्या हारानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. खास आणि स्टायलिश दिसण्यासाठी ईशानं तिची आई नीता अंबानी यांचा शाही हार घातला. तिचा सॉलिटेअर नेकलेस प्रसिद्ध Cartier Toussaint Necklace पासून इंस्पायर्ड आहे. खास गोष्ट म्हणजे, हा नेकलेस 136 कॅरेटचा आहे. याला Queen of Holland म्हणतात. मिडिया रिपोर्ट्सनुसार, हा हार राजा नवनगर यांनी बनवला होता.   






यंदा मेट गालामध्ये कुणा-कुणाचा डेब्यू? 


यंदा मेट गालामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांजनं आपला डेब्यू केला आहे. यावेळी शाहरुख आपल्या किंग खान स्टाईल लूकमध्ये दिसून आला. शाहरुखच्या मेट गाला लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, यंदा कियारा अडवाणीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कियारा मेट गालाच्या रेड कार्पेटवर आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Met Gala 2025: कियाराचा बेबी बंप, दिलजीतचा ट्रेडिशनल लूक अन् शाहरुखची किंग स्टाईल ग्रँड एन्ट्री; मेट गालाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड झळकलं PHOTO