India Vs Pakistan War Mock Drill : केंद्र सरकारने (Central Government) संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल. यापूर्वी 1971 च्या युद्धाच्या वेळेला झालेली मॉक ड्रील झाली होती. त्यानंतर देशात कधीच ती झालेली नाही. त्यामुळे भारत खरंच पाकिस्तान (India vs Pakistan) सोबत पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉक ड्रील म्हणजे काय? त्यात नेमके काय होणार? ती कशी होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन (Abhay Patwardhan) एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन म्हणाले की, मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. त्यात हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट करणे. रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे? हल्ला झाल्यास पडझड झाली आणि काही दुखापती झाल्या तर त्यांना उपचार कसे करायचे किंवा दुखापतग्रस्तांची सेवा कशी करायची? त्यात विद्यार्थी नगरसेवक आणि एनसीसीचे छात्र यांचा सहभाग कसा असला पाहिजे? महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया आणि हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव, याप्रमाणे काही निर्देश देण्यात आले असून त्याची मॉक ड्रील करण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक राज्यात मॉक ड्रील आवश्यक
देशात अशा पद्धतीचे मॉक ड्रील 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच होत आहे. याबाबत विचारले असता कर्नल अभय पटवर्धन म्हणाले की, 1984 साली आम्ही अमृतसर येथे मॉक ड्रील केली होती. पण हे जे काही मॉडेल आहे हे आपल्या सुरक्षेसाठी असतं. हे त्या राज्यांसाठी आहे जे सीमावर्ती राज्य आहे.आजच्या युगात बॉम्बिंग हे कुठेही होते. त्यामुळे पाकिस्तानच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक राज्यात मॉक ड्रील करणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःला कसे वाचवायचे हे अजून नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे सरकारने उचललेले हे पाहून अत्यंत स्तुत्य आहे, असे त्यांनी म्हटले.
सरकारने लोकांना सुरक्षिततेबाबत सांगायला हवं
सरकारने उचललेले पाऊल हे अनेकांना सावध करणारे आहे. मात्र अनेक जणांच्या मनात तणाव देखील निर्माण होऊ शकतो. याबाबत विचारले असता त्याचा उलट प्रभाव देखील होऊ शकतो. तसे झाले नाही तर त्याची खिल्ली देखील उडवली जाऊ शकते किंवा लोक म्हणतील उगीचच आमच्याकडून हे काय करून घेता. काही लोक म्हणतील आम्ही प्रॅक्टिस करत आहे. त्यामुळे आमच्या शहरावर हल्ला होणारच आहे. त्यामुळे नागरिक भीतीत राहतील. पाकिस्तानमधील लोक अन्नधान्याचा साठा करत आहेत, तसं आपल्या येथे सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस ही प्रॅक्टिस होईल त्यावेळी सरकारने लोकांना सांगायला हवे की, हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे अभय पटवर्धन यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा