Met Gala 2025: कियाराचा बेबी बंप, दिलजीतचा ट्रेडिशनल लूक अन् शाहरुखची किंग स्टाईल ग्रँड एन्ट्री; मेट गालाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड झळकलं PHOTO

Met Gala 2025: मेट गालाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटी यंदा मेट गालामध्ये सहभागी झालेत. मेट गालाच्या रेड कार्पेटवर कोण, कोणत्या लूकमध्ये अवतरलं...

Bollywood Met Gala 2025

1/10
5 मे रोजी न्यू यॉर्कमध्ये मेट गालाला सुरुवात झाली. मोठ्या थाटामाटात सोहळा सुरू झाला. यामध्ये फक्त हॉलिवूड सेलिब्रिटीच नाहीतर अनेक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटीही रेड कार्पेटवर दिसून आले.
2/10
किआरा अडवाणी, दिलजीत दोसांझ आणि शाहरुख खान यांनी यावर्षी मेट गालामध्ये डेब्यू केला. याशिवाय प्रियांका चोप्राही मेटच्या रेड कार्पेटवरही परतली.
3/10
पंजाबी सिनेमाचा रॉकस्टार दिलजीत दोसांझनं यावर्षी मेट गालामध्ये दमदार पदार्पण केलंय. यावेळी तो पंजाबच्या पारंपारिक पोशाखात दिसला.
4/10
दिलजीत दोसांझनं आयव्हरी व्हाईट महाराजा स्टाईल शेरवानी वेअर केलेली. ज्यावर गोल्डन जरीनं वर्क केलं होतं. डोळ्यात सूरमा, हातात खंजीर आणि पाठीवर पंजाब घेऊन, दिलजीतनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
5/10
यावर्षी मेट गालामध्ये बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आणि मॉम टू बी कियारा अडवाणीनंही धमाकेदार एंट्री घेतली. यावेळी, कियारानं मेट गालाच्या रेड कार्पेटवर तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केलाय.
6/10
मेट गालासाठी कियारा अडवाणीनं काळ्या रंगाच्या गाऊनसह ट्रेल लूक कॅरी केलेला. तिनं वेअर केलेली ज्वेलरीही हटके होती. किआरा रेड कार्पेटवर पोहोचताच सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या.
7/10
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पाचव्यांदा मेट गालाच्या रेड कार्पेटवर उतरली. यावेळीही तिनं काहीसा हटके पण क्लासी लूक केलेला.
8/10
प्रियांका चोप्रानं व्हाईट आणि ब्लॅक रंगाचा पोल्का डॉट ड्रेस वेअर केलेला. त्यासोबत तिनं डोक्यावर एक मोठी हॅटही घेतलेली. तिच्या ग्रीन डायमंड लॉकेटनं सौंदर्यात भर घातलेली.
9/10
बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननंही मेट गालाच्या रेड कार्पेटवर यंदा डेब्यू केला. त्यानं रेड कार्पेटवर किंग स्टाईलमध्ये ग्रँड एन्ट्री घेतली. त्याचे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
10/10
मेट गालामध्ये शाहरुख खाननं ब्लॅक अंदाजात दिसला. यासोबत त्यानं कस्टमाइज्ड सोन्याचे दागिने घातलेले. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
Sponsored Links by Taboola