Irrfan Khan Death Anniversary :  बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याची आज दुसरी पुण्यतिथी आहे. दोन वर्षांपूर्वी या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला होता. 29 एप्रिल 2020 रोजी इरफाननं वयाच्या 54 वर्षी अखेरचा श्वास घेतला. आजही इरफानचे चाहते त्याचे चित्रपट आवडीनं पाहतात. इरफानची तब्येत त्याचा शेवटचा चित्रपट म्हणजेच अंग्रेजी मीडियम (Angrezi Medium) रिलीज झाल्यानंतर बिघडली. या  चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान इरफाननं एका व्हिडीओच्या माध्यमातून  खास मेसेज चाहत्यांना दिला होता. 


व्हिडीओमध्ये इरफान म्हणतो, 'नमस्कार मी इरफान, मी आज तुमच्यासोबत आहे पण आणि नाही पण. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास  आहे. मला या चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते. पण सध्या माझ्या शरीरामध्ये काही अनवॉन्टेड पाहूणे आहेत. ज्यांच्यासोबत माझं बोलणं सुरू आहे. पाहूयात आता काय होतंय. जे होईल त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. असं म्हटलं जातं की, 'व्हेन लाइफ गिव यू ए लेमन मेक ए लेमोनेड' पण हे फक्त बोलायला चांगलं आहे. जेव्हा आयुष्य खरंच हातात लिंबू देतं तेव्हा त्याची शिकंजी तयार करणं खूप कठिण असतं. पण सध्या पॉझिटिव्ह राहणं हाच एक पर्याय आहे.'






इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 मध्ये जयपूर येथे झाला होता. त्याचं पूर्ण नाव शाहबजादे इरफान अली खान असं आहे. इरफानने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. इरफानने आपल्या करिअरच्या सुरुवातीला चाणक्‍य, भारत एक खोज, चंद्रकांता यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं.  'मकबूल', 'रोग', 'लाइफ इन अ मेट्रो', 'स्‍लमडॉग मिलेनियर', 'पान सिंह तोमर', 'द लंचबाक्‍स' यांसारख्या चित्रपटांमुळे सिनेसृष्टीत वेगळी ओळख मिळाली होती.


हेही वाचा :