Ajay Devgn VS Kiccha Sudeep : कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी भाषेबाबत दिलेल्या विधानावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अजय देवगणने आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर तुमचे चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करतात?" असा सवाल अजय देवगणने किच्चा सुदीपला केला आहे.
अलीकडेच किच्चा सुदीपने एका चित्रपटाच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सांगितले होते की, "हिंदी आता राष्ट्रभाषा नाही." किच्चा सुदीपच्या या विधानाला अभिनेता अजय देवगणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच किचा सुदीपला असा सवालही केला आहे की, जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर साऊथ इंडस्ट्रीतील निर्माते त्यांचे चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करतात? यानंतर ट्विटरवर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. दोघेही एकामागून एक ट्वीट करत एकमेकांना प्रत्युत्तर देत आहेत. यावर नेटकऱ्यांनीही चर्चेला आणखी उधाण आणलं आहे.
अजय देवगणचे किच्चा सुदीपला सडेतोड उत्तर
अजय देवगणने ट्वीट करत म्हटले आहे की, "सुदीप, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन."
अजय देवगणच्या उत्तरावर किच्चा सुदीपचे स्पष्टीकरण
किच्चा सुदीपने लिहिले, "सर, मी ज्या संदर्भात असे म्हटले आहे, त्या संदर्भात मला वाटते की माझा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. कदाचित मी माझा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू शकेन. मी तुम्हाला भेटल्यानंतर माझा मुद्दा नक्की मांडेन. माझा हेतू दुखावण्याचा, चिथावणी देण्याचा किंवा वाद घालण्याचा नव्हता. मी असे का करू? सर."
"मी माझ्या देशाच्या प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय वाढवायचा नाही. मला तो इथेच संपवायचा आहे. मी म्हटल्याप्रमाणे मला जे म्हणायचे होते ते नाही." ते समजले. तुझ्यावर खूप प्रेम. मला आशा आहे की लवकरच भेटू."असं किच्चा सुदीप म्हणाला.
नेमकं काय घडलं ?
'हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही', असे किच्चा सुदीप एका कार्यक्रमात म्हणाला होता. त्यावरून हा वादाला तोंड फुटले आहे.
महत्वाच्या बातम्या :