Ira-Nupur Wedding Reception : काही दिवसांपूर्वी आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानचा विवाह थाटात पार पडला. उदयपूरमध्ये विवाह सोहळा पार पडल्यानंतर अमिर खान मुंबईत (Mumbai) जंगी रिसेप्शन दिले आहे. आयरा खान आणि नूपर यांच्या विवाहाच्या रिसेप्शनला राजकारणी मंडळींपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 


बॉलिवूड सेलिब्रिटींमधून शारुख खान (Shah Rukh Khan), माधुरी दिक्षित (Madhuri Dikshit), टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यन हे कलाकार उपस्थित होते. मात्र, अमिर खानने खास निमंत्रण देऊनही काही सेलिब्रिटी उपस्थित राहिले नाहीत. बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी आयरा हिच्या लग्नाच्या रिसेप्शनला किरण राव, सनी देओल उपस्थित नव्हते. आयराच्या विवाह रिसेप्शनला कोण कोण निमंत्रण देऊनही उपस्थित राहिले नाही? हे जाणून घेऊयात. 


आमिरची पत्नी किरण राव यांची अनुपस्थिती 


अभिनेता आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव ही आयराच्या रिसेप्शनला उपस्थित नव्हती. मुंबईत आमिरने (Aamir Khan) लेकीच्या विवाहासाठी शाही रिसेप्शनचे आयोजन केले होते. मात्र, आमिरच्या पत्नीनेच रिसेप्शनकडे पाठ फिरवली होती. ती आजारी असल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकली नाही, असे आमिर खानने स्पष्ट केले होते. 


करीना कपूर आणि सैफ अली खान 


बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही आमिर खानची चांगली मैत्रीण आहे. मात्र, तिने देखील रिसेप्शनला हजेरी लावली नाही. शिवाय करिनाचा पती सैफ अली खान देखील या रिसेप्शनला उपस्थित नव्हता. 


अक्षय कुमारचीही दांडी 


बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अक्षय कुमारनेही आयराच्या रिसेप्शनला दांडी मारली. त्यामुळे चाहतेही हैराण झाले आहेत. दरम्यान, अक्षय यावेळी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून पुढे आली आहे. 


देओल बंधूंची अनुपस्थिती 


अक्षय कुमार बरोबरच बॉलिवूडमध्ये सध्या हिट सिनेमे देणारे सनी देओल आणि बॉबी देओलही आयराच्या रिसेप्शनला गैरहजर राहिले. सोशल मीडियावर आयराचे लेकीच्या विवाहाचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. 


ऐश्वर्या आणि अभिषेकही फिरकले नाहीत


देओल बंधू, करिना नंतर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनही आयराच्या रिसेप्शनला फिरकलेले नाहीत. त्यामुळ सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 


आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी


आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या वेडिंग रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात शाहरुख खान, सलमान खान, हेमा मालिनी, रेखा, सायरा बानो, माधुरी दीक्षित, जुही चावला, कतरिना कैफ, रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. आयरा-नुपूरवर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


 




इतर महत्वाच्या बातम्या 


Marathi Movie: मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी'; हृता दुर्गुळेचा चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला