Marathi Movie: मालिका, चित्रपट (Marathi Movie) आणि नाटक या माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. हृताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशताच हृतानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव 'कन्नी' (Kanni) असं आहे. या चित्रपटाचं पोस्टर हृतानं शेअर केलं आहे. तसेच तिनं या चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील माहिती चाहत्यांना दिली आहे.


'कन्नी' चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष (Kanni Poster Out)


हृता दुर्गुळेनं तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये हृता ही लंडनमधील क्लॉकला मिठी मारताना दिसत आहे. तर या पोस्टमध्ये अभिनेता अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, ऋषी मनोहर, वल्लरी विराज दे देखील दिसत आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन हृता दुर्गुळेनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी'.. 8 मार्च पासून सर्व चित्रपटगृहांत!"






कन्नी कधी होणार रिलीज? (Kanni Movie Release Date)


हृता दुर्गुळेचा कन्नी हा चित्रपट 8 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कन्नी या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  हृता दुर्गुळेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या कन्नी या चित्रपटाच्या पोस्टरला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मी 8 मार्चची अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'कन्नी हे हृताच्या चित्रपटातील कॅरेक्टरचं नाव आहे का?' आता कन्नी या नावाचा अर्थ काय आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.


हृताचे चित्रपट आणि मालिका 


 टाईपमपास-3, अनन्या या चित्रपटांमधील हृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हृतानं मन उडू उडू झालं, फुलपाखरु आणि दुर्वा या मालिकांमध्ये काम केलं आहे. आता हृताच्या कन्नी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Hruta Durgule: हृता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांची अशी आहे लव्ह स्टोरी; अभिनेत्रीच्या सासूनं देखील केलंय हिट मालिकांमध्ये काम