Indias richest actress : आपल्याला कोणी विचारलं की, बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री (Indias richest actress) कोण? तर आजच्या घडीला कोणीही आलिया भट (Alia Bhatt), दीपिका पादुकोण (Deepika Padukon) यांच्या सारख्या अभिनेत्रींची नावे सांगेन. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की, सिनेमात काम करण्यासाठी कोट्यावधींची रक्कम आकारणाऱ्या अभिनेत्री सर्वात श्रीमंत असतील तर तसं नाही. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीचं नाव प्रेक्षकांसाठी नवं नाही. सध्या जरी ती सिनेमात काम करत नसली तरी तिने एकेकाळी बॉलिवूडला हिट सिनेमे दिले आहेत. यातून तिने कोट्यवधींची कमाई केली आहे.
Hurun Rich List 2024 मधून बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? याबाबतची माहिती समोर आली होती. श्रीमंतीच्या बाबतीत तिने ऐश्वर्या रायला देखील मागे टाकले आहे. या यादीनुसार, जुही चावला (Juhi chawla) बॉलिवूडची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री आहे. तिच्याकडे 4600 कोटींची संपत्ती आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल कारण गेल्या काही वर्षांमध्ये जुही चावलाचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. तिने 2009 साली केलेला एक सिनेमा तिचा आत्तापर्यंतचा शेवटचा हिट सिनेमा ठरला होता.
जुही चावलाकडे एवढी संपत्ती आहे?
तुम्हाला वाटतं असेल की, खरंच जुही चावलाकडे (Juhi chawla) एवढी संपत्ती आहे? ती सध्या सिनेमात काम करत नसली तिने मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय तिचं एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. यातून ती दरवर्षी कोट्यावधी रुपये कमावते. बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देणाऱ्या जुहीने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघावरही तिची सह मालकी आहे.
जुही चावल्याने नव्वदीच्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे केले. यावेळी तिने मिस इंडियाचा किताबही जिंकला होता. अभिनेता आमीर खान सोबतच्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या सिनेमातून तिला जास्त कमाई करता आली नव्हती. जुही आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर या संघाची सहमालकीण आहे.
केकेआरची सहमालकीण आहे जुही चावला
केकेआरची मालकी शाहरुख खान आणि जुही चावलाने (Juhi chawla) संयुक्तरित्या बाळगली आहे. जुही चावला आणि तिचा पती जय मेहता आणि शाहरुख खानने आयपीएलमधील केकेआरचा संघ 623 कोटी रुपयांना खरेदी केला होता. फोर्ब्सच्या मते, केकेआर या संघाची सध्याची किंमत 1.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,139 कोटी रुपये) आहे.
जुही चावला आयपीएलमधील संघाची सह-मालकीण तर आहेच..पण महत्त्वाचं म्हणजेच ती रेड चिलीज ग्रुपची सह-संस्थापक देखील आहे. जी शाहरुख खानची प्रॉडक्शन कंपनी आहे. याशिवाय, जुही चावलाचा पती मोठा उद्योगपती आहे. सौराष्ट्र सिमेंट लिमिटेड ही जुही चावलाचा पतीची कंपनी आहे. मेहता ग्रुपच्या अशा अनेक कंपनी आहेत. जुहीने रिअल इस्टेट, रेस्टॉरंट्स आणि लक्झरी प्रॉपर्टीजमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.
मुंबईतील मरबार हिलवर घर, पोरबंदरमध्येही आलीशान बंगला
मुंबईतील सर्वात महागड्या भागांपैकी एक असलेल्या मलबार हिलवर जुही चावलाचं आलीशान घरं आहे. तिचं हे घर अनेक मजल्यांचं आहे. याशिवाय तिचे एक आलिशान घर आहे, ज्यामध्ये अनेक मजले आहेत. गुस्तोसो (इटालियन) आणि रु डू लिबान (लेबनीज) ही दोन आलिशान रेस्टॉरंट्स आहेत. जुही आणि जय मेहता यांचा पोरबंदरमध्ये एक मोठा बंगला देखील आहे.
जुही चावला सध्या बॉलिवूडमध्ये किंवा सिनेक्षेत्रात काम करत नसेल पण ती कॅमेऱ्यापासून दूर राहिलेलीन नाही. तिने मॅगी, पेप्सी, कुरकुरे, रूह अफजा, केलॉग्स, इमामी बोरोप्लस आणि केश किंग आयुर्वेदिक ऑइल सारख्या ब्रँडच्या जाहिराती देखील केल्या आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून देखील जुही मोठी कमाई करते. याशिवाय तिच्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. बीएमडब्ल्यू 7-सिरीज (1.8 कोटी रुपये), मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (1.7 कोटी रुपये), जॅग्वार एक्सजे (1.2 कोटी रुपये) आणि पोर्शे (1.36 कोटी रुपये) या महागड्या गाड्या तिच्याकडे आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या