Donald Trump : अमेरिकेत (America presidential election ) पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ऐतिहासिक विजय मिळवत प्रतिस्पर्धी कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा पराभव केला आहे. त्यांच्या विजयानंतर अमेरिकेच्या राजकीय, सामाजिक त्याचप्रमाणे सांस्कृतिक अशा सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येतात. इतकच नव्हे तर आता भारतीय देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतंय. 


बॉलिवूड अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर हिने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आकांक्षाने अमेरिकेत मतदान केल्याचा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर ती अमेरिकेची नागरिक असल्याचं समोर आलं आणि भारतीयांनाही मोठा धक्का बसला. पण तिने कमला हॅरिस यांना पाठिंबा दिल्याचं चित्र तेव्हाच स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच आता आकांक्षाने ट्रम्प यांच्या विजयानंतर खरमरीत पोस्ट लिहिली आहे. 


आकांक्षाची पोस्ट नेमकी काय?


आकांक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पोस्ट करत म्हटलं की, 'हे पचवणं खूप कठीण आहे. ही महिलांच्या अधिकारांची, पर्यावरणाच्या संरक्षणाची, अल्पसंख्यांकांसाठीच्या सहानुभूतीची आणि हिंसाचाराच्या प्रतिबंधाची हार आहे. दुराचरण जिंकलंय, द्वेष जिंकलाय आणि वंशवादही जिंकलाय. महिलांवर आक्षेपार्ह टीप्पणी करणारा व्यक्ती जिंकलाय.. पण आता किमान स्टॉक मार्केट काही काळासाठी का होईना पण वर येईल... तसेच आकांक्षाने इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर तिने म्हटलं की,आता युद्ध आणि मृत्यूसाठी सज्ज व्हा..  एन्जॉय द कलयुग...'





कोण आहे आकांक्षा रंजन कपूर?


मुंबईत राहणारी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिने मतदान केल्याचे इंस्टाग्रामवर सांगून तिच्या फॉलोअर्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर ही अभिनेता-दिग्दर्शक शशी रंजन आणि त्यांची पत्नी अनु रंजन यांची मुलगी आहे. तिचा जन्म मुंबईत झाला आणि शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झालं. आकांक्षाने 2020 मध्ये नेटफ्लिक्सवरील 'गिल्टी' चित्रपटामधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने नेटफ्लिक्सच्या 'मोनिका... ओ माय डार्लिंग' या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 


ही बातमी वाचा : 


बॉलिवूड अभिनेत्रीचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मतदान, भारतीय नसल्याचं सत्य समोर येताच चाहत्यांना बसला धक्का