Ajit Pawar on Raj Thackeray : काहीजण म्हणतात अमुक चोरले तमूक चोरले. पण आमदार, जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतील सांगता येत नाही. कधी असं कधी तसं बोलतात. त्याकडं तुम्ही लक्ष देऊं नका असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आम्ही कामाची माणसे, दलबदलु करणारे नाही असेही अजित पवार म्हणाले.
आप्पासाहेब अनेक जण घेऊन आलेत, तिकडे काही ठेवता का नाही?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेचे आप्पासाहेब जगदाळे यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. आताचा पक्ष प्रवेश बघून जयंत पाटील यांना वाटलं असेल आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी दिली असती तर बरं झालं असतं असेही अजित पवार म्हणाले. आप्पासाहेब अनेक जण घेऊन आले आहेत. अजून घेऊन येणार असे सांगत आहेत तिकडे काही ठेवता की नाही? का सगळंच घेऊन येता? असा सवालही अजित पवार यांनी केला.
सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करायचा असतो
मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करायचा असतो ही शिकवण आम्हाला मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले. चांगल काम करणे हे आपलं कर्तव्य असल्याचे अजित पवार म्हणाले. आम्हीपण चांगली चांगली माणस पाहत असतो. पक्ष वाढीसाठी चांगल्या माणसांची गरज असते असेही अजित पवार म्हणाले. कोणतंही काम तीडस नेण्याचं काम आप्पासाहेब जगदाळे यांनी केल्याचे अजित पवार म्हणाले. ते शिक्षण संस्था चांगल्या चालवतात असेही अजित पवार म्हणाले. आप्पासाहेब जगदाळे यांच्या येण्यानं आपली ताकद वाढली असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले, समोरचे उमेदवार तुल्यबळ आहेत, असं समजून आपले आखाडे बांधायचे असतात असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मी कधीही जातीभेद करत नाही. मी बोलतो तसं वागतो असेही अजित पवार म्हणाले. पुढे जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घेतो, त्यावेळी जनता देखील विचार करत असते की बे लोक बोलतो तसे वागतात का असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: