IIFA Winner Full List: गुलाबी शहर, अशी जयपूरची ओळख. याच गुलाबी शहरात, एका भव्य-दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा भव्य सोहळा होता, आयफा अवॉर्डसचा (IIFA Awards 2025). या अवॉर्ड फंक्शनचा पहिला दिवस होता, डिजिटल स्टार्सचा. या खास प्रसंगी अनेक स्टार्सना सन्मानित करण्यात आलं. आयफा सेगमेंटला शोभा डिजिटल रिअॅलिटी अवॉर्ड्स (25th International Indian Film Academy Awards) असं नाव देण्यात आलं होतं. या खास प्रसंगी, अनेक ओटीटी फिल्म्स आणि वेब सीरिजना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 


आयफाची डिजिटल अवॉर्ड्सच्या संध्याकाळ खऱ्या अर्थानं गाजवली ती, 'पंचायत 3'नं. या ओटीटी शोमधील स्टार कास्ट जितेंद्र कुमार, फैसल मलिक, दीपक मिश्रा यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनासाठी सन्मानित करण्यात आलं. तर, कृती सेननला 'दो पट्टी'साठी आणि विक्रांत मेस्सीला 'सेक्टर 36' साठी आयफा अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं.


आयफा ओटीटी फुल विनर लिस्ट



  • बेस्ट फिल्म : अमर सिंह चमकीला 

  • बेस्ट लिडींग रोग फीमेल : कृति सेनन (दो पत्ति) 

  • बेस्ट लिडींग रोल मेल : विक्रांत मैसी (सेक्टर 36) 

  • बेस्ट डायरेक्टर फिल्म : इम्तियाज अली (अमर सिंह चमकीला) 

  • बेस्ट सपोर्टिंग रोल फीमेल : अनुप्रिया गोयंका (बर्लिन) 

  • बेस्ट सपोर्टिंग रोल मेल : दीपक डोबरियाल 

  • बेस्ट ओरिजनल फिल्म : दो पत्ती बेस्ट सीरीज - पंचायत 3 

  • बेस्ट लीडिंग रोग फीमेल सीरीज : श्रेया चौधरी (बैंडिश बंडित 2) 

  • बेस्ट लीडिंग रोल मेल सीरीज : जितेंद्र कुमार (पंचायत 3) 

  • बेस्ट डायरेक्टर सीरीज : दीपक कुमार मिश्रा (पंचायत 3) 

  • बेस्ट सपोर्टिंग रोल फीमेल सीरीज : संजीदा शेख (हीमामंडी: द डायमंड बाजार) 

  • बेस्ट सपोर्टिंग रोल मेल सीरीज : फैसल मलिक (पंचायत 3) 

  • बेस्ट ओरिजनल सीरीज : कोटा फॅक्ट्री सीजन 3 

  • बेस्ट डॉक्यूमेंट्री सीरीज : यो यो हनी सिंह फेमस

  • बेस्ट नॉन स्क्रिप्टेड सीरीज : फैबुलस लाइव्स वर्सेस बॉलिवुड लाईफ


दरम्यान, 8 मार्च रोजी डिजिटल अवॉर्ड्सनंतर आता 9 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना सन्मानित केलं जाईल. आयफाच्या या शानदार कार्यक्रमाचं आयोजन करण जोहर आणि कार्तिक आर्यन करणार आहेत. या खास प्रसंगी, शाहरुख खान, करीना कपूर, शाहिद कपूर, बॉबी देओल, माधुरी दीक्षित आणि इतर कलाकार देखील कार्यक्रमाची शोभा वाढवतील.